Home गुन्हा पश्चिम बंगालमधील पोक्सो गुन्ह्यातील आरोपी ला पुण्यामध्ये अटक

पश्चिम बंगालमधील पोक्सो गुन्ह्यातील आरोपी ला पुण्यामध्ये अटक

0

पश्चिम बंगाल येथील पोलीस ठाणेकडील पोक्सो गुन्हयातील पाहिजे आरोपीस ठोकल्या बेडया
फिरोज शेख : आज दि.23/09/2019 रोजी कुलाघाट पोलीस ठाणे जि.पुर्व मेन्नापुर पश्चिम बंगाल येथील पोलीस उप निरीक्षक श्री चणक सत्यजित व ओजयदास व स्टाफ असे पोलीस ठाणेस येवुन कळविले की, त्यांचे पोलीस ठाणेकडील गु.र.नं.349/2019 भां.द.वि.क. 376 (ड) पोक्सो 6 मधील पाहिजे आरोपी नामे आकाश मंडल वय 22 वर्षे हा अप्पर बिबवेवाडी भागात कोठेतरी राहत असल्याचे लोकेशन प्राप्त झाले

असुन त्यास ताब्यात घेणेकामी आपले पोलीसांची मदत पाहिजे आहे वगैरे कळविल्याने लागलिच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री कुमार घाडगे यांनी पोलीस ठाणेकडील तपास पथकातील पोलीस शिपाई रोहित शिंदे व अतुल महांगडे यांना त्यांचे सोबत मदतीस देवुन त्यांनी अप्पर बिबवेवाडी भागात त्याचा शोध घेवुन त्यास दुर्गामाता गार्डन अप्पर येथुन ताब्यात घेतले आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री कुमार घाडगे यांचे मार्गदर्शनाखाली बिबवेवाडी पोलीस ठाणेचे सपोनि श्री पावसे,पोलीस शिपाई रोहित शिंदे,अतुल महांगडे तसेच पश्चिम बंगाल येथील पोलीस उप निरीक्षक चणक सत्यजित व ओजयदास,पोलीस शिपाई गमकरान थापा,यांनी केली आहे.