Home ताज्या बातम्या पसारा २००५ चे उल्लंघन करणाऱ्या खाजगी सुरक्षा संस्थेच्या चालकांवर कारवाई करणार- मा.अपर पोलीस आयुक्त(गुन्हे) अशोक मोराळे

पसारा २००५ चे उल्लंघन करणाऱ्या खाजगी सुरक्षा संस्थेच्या चालकांवर कारवाई करणार- मा.अपर पोलीस आयुक्त(गुन्हे) अशोक मोराळे

0

पुणे : परवेज शेख पसारा २००५ चे उल्लंघन करणाऱ्या खाजगी सुरक्षा संस्थेच्या चालकांवर कारवाई करणार- मा.अपर पोलीस आयुक्त(गुन्हे) अशोक मोराळे — पुणे पोलीस आयुक्तालयातून महाराष्ट्राच्या इतिहासातील नियोजनबद्ध आणि निर्णयात्मक खाजगी सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या मालकांना सोबत घेऊन त्यांच्याच सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी पोलीस प्रायव्हेट सेक्युरिटी पार्टनरशिप प्रोग्राम (पी-४) हा उपक्रम चालू करून १७००० सुरक्षा रक्षकांपर्यंत पोहचून त्यांचा पुणे अधिक सुरक्षित करण्यासाठी मोठा सहभाग नोंदवण्यासाठी खाजगी सुरक्षा संस्थेच्या चालक व मालकांची त्रैमासिक बैठक झाली.

संपूर्ण शहरात त्याचे पडसाद उमटलेले दिसत आहे. पी-४ च्या निर्मिती आणि नियोजनामुळे एक मोठे सुरक्षा अभियान चालू झाले त्यात सुरक्षितेबद्दल ची आवड,मालकांच्या जबाबदाऱ्या,कर्तव्य,कायदे,शहराच्या कानाकोपऱ्यात जिथे जिथे सुरक्षा रक्षकांचे जाळे आहे तिथे तिथे पोहचले त्या रक्षकांनाही मानाचे स्थान सर्वच आस्थापनेत मिळायला सुरुवात झालेली दिसून येते आहे.
प्रशिक्षित आणि कर्तव्यदक्ष सुरक्षा रक्षकाला खासदूत आणि खाजगी अधिकारी वर्गाला विशेष पोलीस दूत म्हणून गौरवण्यात आले.

त्याचे स्वरूप काल १८ नोव्हेंबर २०१९ च्या दुसऱ्या चालक आणि मालक बैठकीदरम्यान दिसले त्यावेळी पुण्यातील नामांकित खाजगी सुरक्षा पुरविणाऱ्या अंदाजे ३५० हुन अधिक मालकांनी हजेरी लावली.

बैठकीदरम्यान पोलीस आयुक्त, डॉ . के. वेंकटेशम (भापोसे), मा. पोलीस सह आयुक्त रवींद्र शिसवे(भापोसे) यांच्या मार्गदर्शनाखाली मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे l) अशोक मोराळे (भापोसे) यांनी सर्वांना संबोधित केले त्यावेळी सर्व पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे समन्वयक पो.नि श्री लकडे आणि भारत शिल्ड फोर्स प्रा.ली चे संस्थापक सचिन मोरे यांच्या पुढाकारातून झाले.

या बैठकीदरम्यान मंचावरील मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे साहेबांनी सखोल चर्चा करून सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आणि या उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केले.

शहरात सर्व मालकांना एका समसमान धोरणावरती आणले आणि सर्व परवानाधारक एक विश्वास निर्माण केला कि कोणीही लहान-मोठा नाही सर्वांना कर्तव्य व जबाबदाऱ्या शासकीय नियमानुसार पार पडायला भाग पाडले,त्यातून हि त्यांनी या उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करीत स्मार्ट या आधारावर कामकाज करायला सांगितले.
जे चालक व मालक परवाना असूनही कायदे पाळत नाही या उलट आयुक्तांनी दिलेल्या परवान्यांचा गैरवापर करतील,शासनाच्या कलमाचे उल्लंघन करतील किंवा कायदा हातात घेतील तसेच कामगार आणि पसारा कायद्याच्या तरतुदीनुसार कामकाज न करता शासनाची आणि पोलीस प्रशासनाची दिशाभूल करून माहिती लपवून व्यवसाय करतील त्यांना इशारा दिला आणि अशा चालक मालकांवर पसारा २००५ नुसार कारवाई करून त्याचे परवाना रद्द केले जातील असे सांगण्यात आले.

गणपती विसर्जनाला सर्वच पोलीस ठाण्यांतर्गत स्व-इच्छेने मालकांनी २००हून अधिक स्वयंसेवक म्हणून सुरक्षा रक्षकांना बंदोबस्तामध्ये काम करताना दिसले होते त्यांच्या मालकांचा व एम सिक्युरिटीज चे नागेश कोळी यांचा अतिउत्कृष्ठ कर्तव्य केल्याबद्दल हि सन्मान करण्यात आला.

जे एजेन्सी आपल्या संस्थेचे नाव दुसऱ्या नामांकित एजेन्सीच्या नावाने सारखेच नाव देऊन चालवतात त्यांच्यावर कॉपी राईट चे गुन्हे दाखल करण्याचे हि सांगितले.
जे सुरक्षा ठेकेदार म्हणून माहिती लपवतात त्यांना हि तंबी बसावी व कायदा सुव्यवस्था चे व्यवस्थापन करण्यासाठी प्रत्येक्ष प्रत्येक पोलीस ठाण्यांशी खाजगी सुरक्षा पुरवणाऱ्या चालक मालक आणि कर्मचाऱ्यांना लेखी आणि व्हॉटअँप ग्रुप निर्माण करून त्यांना जोडण्यात आले तसेच पोलीस ठाण्यात साप्ताहिक बैठक घेण्यास हि सांगितले आणि व्हॉटअँप ग्रुप चा रिपोर्ट मासिक मीटिंग मध्ये सादर करण्याचे आदेश दिले.

जी परवानाधारक संस्था शासनाचे नियमांचे कायदे पाळत नाहीत ते पी एफ, ई.एस.आय.सी, जी.एस.टी, व इतर शासकीय वेतन भत्ते न देता मुख्य प्रमुख नियुक्ता व चालक/मालक दोघेही मिळून दिशाभूल करत असतील तर त्या त्या विभागाच्या कायदे व नियमानुसार कारवाई या पुढे होईल.

पोलीस आयुक्त, डॉ . के. वेंकटेशम (भापोसे), मा. पोलीस सह आयुक्त रवींद्र शिसवे (भापोसे), यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहराचा चेहरामोहरा बदलणारे, कर्तव्यदक्ष व अतिसंवेदशील आणि अत्याधुनिक गोष्टींचा वापर करून तसेच विविध समाजोपयोगी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून, सर्वच क्षेत्रातील गुन्हेगारी संपविण्याचा विडा घेतलेले पुणे मा. अपर पोलीस आयुक्त ( गुन्हे ) अशोक मोराळे साहेब यांनी पी-४ सहभाग नोंदवून शहरात कायदा-सुव्यवस्था राखण्यासंबंधी कठोर पावले उचलेले आहे. त्यात त्यांनी स्मार्ट पॉलिसींग सोबत स्मार्ट प्रायव्हेट सेक्युरिटी एजेन्सी हि करण्यावर भर दिला आहे ज्या ज्या ठिकाणी एजेन्सीचे गार्डस काम करतात तिथे कॅमेरे लावण्याचे हि सांगितले आणि सी-वॉच मध्ये घेण्याचेही आदेश दिले.

अपर पोलीस आयुक्त मा.मोराळे साहेबामुळे चालक व मालक आणि सुरक्षा कर्मचारी यांच्या मध्ये कमालीचा बदल झालेला दिसला पाहिजे पुढच्या बैठकीला यशोगाथा सोबत घेऊन या असेही सांगायला विसरले नाहीत. कदाचित या आदेशामुळे गुन्हे आणि त्या संबधीची माहिती पुढे येताना दिसेल तसेच त्यांनी समर्थता,सावधपणा, वृत्ती, सौजन्य, शिस्त, अनुकरणीय वर्तणूक, कल्पनाशक्ती, कर्तव्यबाबत आस्था, निष्ठा, चातुर्य, यावर भर दिला. त्यात त्यांनी घातपाती किंवा हेरगिरीची, विघातक कृत्ये, सुरक्षितेच्या नियमांचे उल्लंघन, मादक व अंमली पदार्थावर करडी नजर, गैरवर्तणूक, अनैतिक किंवा असभ्य वर्तवणूक, धांगडधिंगा, दृष्ट बुद्धीने केलेल्या खोड्या, अफवा, रात्रीचे मद्यधुंद पार्ट्या, मोठ्या आवाजातील नाचगाणे ..इ यावर अमंलबजावणी साठी माहिती देण्याचेही आवाहन केले आणि घरफोडी व वाहन चोऱ्यांवर नियंत्रण आणण्यावर सर्वांचा सहभाग हि पाहिजे व शहरात कायदा व सुव्यस्था राखण्यासंबंधी आणि सभोवतालच्या परिसरात गुन्हा घडू नये सर्व नागरिकांनी काळजी घेयला सांगितले.

या बैठकीचे सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक लकडे यांनी केले तर सचिन मोरे, निवृत्त कर्नल गुरमितसिंग गिल, संभाजी उकिरडे,बालाजी माने, बलवंतसिंग मेहता, दिलीप सोनवणे, राज राठोड इ. मान्यवरांचे मनोगते झाले.