हायलाइट्स:
- अभिनेत्री अनुष्का शर्मा बऱ्याच काळ बॉलिवूडपासून आहे दूर
- बॉलिवूडपासून दूर असूनही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते अनुष्का
- सध्या पती विराट कोहलीसोबत इंग्लंडमध्ये टीम इंडियाला चिअरअप करतेय अनुष्का शर्मा
भारतीय टीम न्यूझीलंडसोबत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल मॅच खेळत असताना पाऊस आणि प्रकाशाच्या कमतरतेमुळे सामन्यात व्यत्यय येत आहे. असं असताना अनुष्का मात्र तिथे इंडियन स्नॅक्स एन्जॉय करत आहे. अनुष्कानं तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवर समोसे आणि लाल चटणी यांनी भरलेल्या प्लेटचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना तिनं लिहिलं, ‘जेव्हा कमी प्रकाश तुमच्यासाठी समोसे आणतो.’ इंग्लंडमधील पाऊस, कमी असलेला प्रकाश आणि अशा वातावरणातली मॅच सुरू असताना अनुष्का मात्र समोसा पार्टी एन्जॉय करत आहे. तिच्या या फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.

अनुष्का शर्मानं याआधीही इंग्लंडमधून अनेक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. सध्या अनुष्का मुलगी वामिकासोबत टीम इंडियाला चिअरअप करत आहे. अनुष्काच्या कामाबद्दल बोलायचं तर ती अखेरची कतरिना कैफ आणि शाहरुख खान यांच्यासोबत २०१८ साली रिलीज झालेल्या ‘झिरो’ या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर अनुष्कानं अद्याप कोणताही चित्रपट साइन केलेला नाही. सध्या ती मुलगी वामिकासोबत आपलं आईपण अनुभवत आहे.