Home ताज्या बातम्या पाऊस, पुराबद्दल अफवा पसरवल्यास कठोर कारवाई : पोलीस

पाऊस, पुराबद्दल अफवा पसरवल्यास कठोर कारवाई : पोलीस

0

पुणे:परवेज शेख

राज्यभरासह पुणे व जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. नद्या, नाले तसेच धरणे भरली आहेत. मात्र, या कालावधीत धरण फुटले, रस्ता खचला तसेच पूल कोसळला असे मेसेज सोशल मीडियातून व्हायरल होत आहे. यावर कोणीही विश्‍वास ठेवू नये. आवश्‍यक माहिती तसेच खात्रीसाठी पोलीस नियंत्रण कक्षाला संपर्क साधावा, असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे. खोटी माहिती पसरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे विशेष शाखेचे उपायुक्‍त मितेश घट्टे यांनी सांगितले आहे.