Home बातम्या आंतरराष्ट्रीय पाकिस्तानला मिर्ची लागली… भारताकडे येणारी ‘समझोता एक्सप्रेस’ रोखली

पाकिस्तानला मिर्ची लागली… भारताकडे येणारी ‘समझोता एक्सप्रेस’ रोखली

0

नवी दिल्ली/इस्लामाबाद :  केंद्र सरकारकडून जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला असून या निर्णयामुळे पाकिस्तानला चांगलीच मिर्ची लागली आहे. पाकिस्तानने बुधवारी (7 ऑगस्ट) भारतासोबतचे द्विपक्षीय व्यापारी संबंध तोडले आहेत. याशिवाय, भारतासोबतचे मुत्सद्दी संबंध सुद्धा डाऊनग्रेड केले आहेत. म्हणजेच, राजकीय संबंधांचा दर्जा कमी केला आहे. त्यानंतर पाकिस्तानने काही काळासाठी आपली हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेतला होता. तर, आता समझोता एक्सप्रेसही थांबविली आहे. पाकिस्तानी माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले असून भारतावर दबाव वाढविण्याचा प्रयत्न पाकिस्तानाकडून करण्यात येत आहे. 

पाकिस्तानने काही काळासाठी आपली हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विमानांच्या मार्गांमध्येही काही बदल करण्यात आले आहेत. त्यानंतर, आता भारत-पाकिस्तान या दोन देशांतील नागरिकांना जोडणारी समझोता एक्सप्रेसही पाकिस्तानकडून थांबविण्यात आली आहे. भारताने जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्याच्या विरोधात पाकिस्तानने हा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या सिव्हिल अ‍ॅव्हिएशन ऑथॉरिटीद्वारे एक नोटीस देण्यात आली आहे. त्यामध्ये 6 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरदरम्यान ही हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, समझौता एक्सप्रेसबद्दल किती दिवसांसाठी बंद, हे निश्चितपणे सांगण्यात आलं नाही. मात्र, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपण युद्धाला तैयार असल्याचं म्हटलं असून सीमारेषेवर सैन्यही तैनात करण्यात आले आहे.