Home बातम्या आंतरराष्ट्रीय पाकिस्तानात हत्या झालेल्या निम्रिताच्या शरीरावर पुरषाच्या डीएनएचे नमुने

पाकिस्तानात हत्या झालेल्या निम्रिताच्या शरीरावर पुरषाच्या डीएनएचे नमुने

0

लाहोर : पाकिस्तानात संशयास्पद मृत्यू झालेली वैद्यकीय महाविद्यालयातील हिंदु विद्यार्थीनी निम्रिता चंदानी हिच्या शरीरावरून आणि कपड्यावरून पुरषाचे डीएनए नमुने न्यायवैद्यकचाचणी पथकाला मिळाले आहेत, अशी खळबळजनक माहिती समोर येत आहे.

शहीद मोहतरमा बेनझीर भुत्तो वैद्यकीय विद्यापीठात अंतिम वर्षात शिकणाऱ्या निम्रिताच्या डीएनए चाचणीचे अहवाल मिळाले आहेत. ते न्यायालयात सादर केले आहेत, असे लरकाना पोलिस ठाण्याचे अधीक्षक बनगाश यांनी सांगितले. निम्रिताचा मृतदेह 16 सप्टेंबर रोजी सापडला होता. त्यानंतर 17 रोजी डीएनए टेस्ट करण्यात आली होती. तिच्या होस्टेलरूममध्ये ती मृतावस्थेत आढळली होती.

विद्यापीठाच्या सुत्रांनी प्रथमत: हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे जाहीर केले होते. प्रातमिक शवविच्छेदन अहवालातही तशी शक्‍यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र तिच्या डॉक्‍टर भावाने हा खून असल्याचा आक्षेप घेतला होता. पोलिसांनी या प्रकरणी तिच्या दोन वर्गमित्रांना अटक केली होती. त्यापैकी मेहरान अब्रो हा तिचा जवळचा मित्र होता. दरम्यान तपासपथकांनी दिलेल्या माहितीनुसार निम्रिताला मेहरानशी विवाह करायचा होता. मात्र, त्याला त्याचा विरोध होता, असे त्याने सांगितले आहे.
सिंध प्रांतातील जनता आणि मृताच्या नातेवाईकांनी सरकारवर दबाव आणल्यानंतर न्यायलतयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.