रावळपिंडी: पाकिस्तानी सैन्याचं विमान नागरी वस्तीवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत १७ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर १२ जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पाच सैनिकांचा समावेश आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. रावळपिंडीजवळच्या मोरा कालू गावात आज पहाटे हे विमान कोसळले. पाकिस्तानी सैन्यानं दिलेल्या माहितीनुसार, अपघातात विमानाचे दोन्ही पायलट मरण पावले आहेत. या घटनेनंतर रावळपिंडीतील रुग्णालयांमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळं झाला याबाबत काहीही माहिती मिळू शकलेली नाही.
- Advertisement -