Home शहरे औरंगाबाद पाच लाखाची खंडणी मागणारा पत्रकार पुत्रासह रंगेहात अटक

पाच लाखाची खंडणी मागणारा पत्रकार पुत्रासह रंगेहात अटक

0

पुणे : परवेज शेख पाच लाखाची खंडणी मागणारा पत्रकार पुत्रासह रंगेहात अटक

औरंगाबाद : 17 ऑक्टोबर : बीड बायपास वर त्रिमूर्ती चौकातील दारूचे दुकान अवैधरित्या हलवले असल्याची तक्रार एक्साइज डिपार्टमेंट ला करतो अशी धमकी देत पाच लाख रुपयाची खंडणी मागणाऱ्या पत्रकार पिता पुत्रास पुंडलिक नगर पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.

जगन सुकाजी कीर्ती शाही वय 55 वर्ष आणि मिलिंद जगन कीर्तीशाही वय 35 वर्ष असे खंडणीबहाद्दर पिता-पुत्र असून जगन कीर्तीशाही हा साप्ताहिक “जयभीम मिशन” चा संपादक आहे.

याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार प्रदीप लालचंद मणकानी यांची बीड बायपास वर “लकी वाईन शॉप” नावाने देशी-विदेशी दारूची दुकान आहे. 1 वर्षापूर्वी त्यांनी त्रिमूर्ती चौकातून त्यांची ही दुकान बीड बायपास वर हलवली आहे.

पंधरा दिवसापूर्वी खंडणी बहाद्दर पत्रकार जगन कीर्तीशाही हा प्रदीप मणकानी यांच्याकडे गेला आणि त्यांना सांगितले की मी एक्साइज डिपार्टमेंट कडून माहितीची अधिकारांतर्गत काही माहिती गोळा केली आहे, त्यानुसार तुम्ही एक किलोमीटरच्या आत देशी दारूचे दुकान असताना तुमची देशी-विदेशी दारू ची दुकान बीड बायपास वर हलविली हे सिद्ध होते. ही बाब मी एक्साइज डिपार्टमेंट कळे तक्रार करून निदर्शनास आणून देणार आहे. तक्रार करायची नसेल तर मला पाच लाख रुपये द्यावे लागेल. त्रास नको म्हणून प्रदीप मणकानी यांनी त्याला 50 हजार रुपये त्यावेळीस दिले. बुधवारी जगन कीर्तीशाही यांनी पुन्हा प्रदीप मणकानी यांचे भाऊ राजू यांना पाच लाख रुपयाची खंडणीची मागणी केली. आणि खंडणीची रक्कम दुपारी दोन वाजता बीड बायपास वरील हॉटेल नंदिनी येथे घेऊन येण्यास सांगितले.

प्रदीप मणकानी यांना खंडणी देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबतची तक्रार पोलिस स्टेशन पुंडलिक नगर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे यांचेकडे केली. सोनवणे यांनी याबाबतची माहिती परीमंडळाच पोलीस उपायुक्त डॉक्टर खाडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त साळोखे यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला.

पोलिसांनी कागदी नोटांचे चार लाख रुपये दिसतील असे बंडल तयार केले आणि ते बंडल तक्रारदार यांच्याकडे देऊन खंडणी बहाद्दर यांचे कडे पाठवले. ते पैशाचे बंडल खंडणी बहाद्दर पत्रकार पिता-पुत्रांकडे सुपूर्द केल्यानंतर पोलिसांनी छापा घालून दोघांना अटक केली त्यांचेकडून खंडणीची रक्कम व कागदपत्रे जप्त केली.

दोन्ही आरोपीच्या विरुद्ध पोलिस स्टेशन पुंडलिक नगर येथे कलम 384, 385, 34 भारतीय दंड विधान अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा संपादक पत्रकार सराईत ब्लॅकमेलर असल्याचे पोलिसांनी सांगितले यापूर्वीही त्यानी अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत.

पोलीसांनी रचलेल्या सापळ्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक विकास खटके, विनायक कापसे, मीरा चव्हाण, पोलीस हवलदार मच्छिंद्र शेळके, रमेश सांगळे, बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, प्रवीण मुंडे, राजेश यादमळ, दीपक जाधव, जालिंदर मांटे, रवी जाधव, नितेश जाधव, कोमल तारे आणि माया उगले यांचा समावेश होता.