पाच लाख रुपये किमतीचा मांडूळ विकणाऱ्यास खडक पोलीसानी जेरबंद केले

- Advertisement -

पाच लाख रुपये किमतीचा मांडूळ विकणाऱ्यास खडक पोलीस स्टेशन ने जेरबंद केले

पुणे : परवेज शेख सदर बाबत अधिक माहिती अशी की खडक पोलीस स्टेशन कडील अधिकारी/कर्मचारी हे काशेवाडी पोलीस चौकीचे हद्दीत पेट्रोलीग करीत असतांना काशेवाडी पोलीस चौकी मार्शल डयुटीस असणारे पोका ८९४८ आशिष चव्हाण व पोको ७६९६ जितेंद्र कांबळे यांना त्याचे बातमीदाराने बातमी दिली , एक मुलगा रंगाने गोरा असुन त्याचे अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट व निळे रंगाची जीन्स पेन्ट फाटलेल्या डिझाईनची घातलेला अशा वर्णनाचा इसम पाच लाख रुपये किंमतीचा मांडुळाची विक्री करण्याकरीता येणार आहे. सदर बातमी मिळाल्यावर मा.श्री भरत जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक पोलीस स्टेशन यांचे आदेशाने श्री.संजय पांढरे पोलीस उप निरीक्षक व काशेवाडी पोलीस चौकीचे पोना रणजित घडशी पोका आशिष चव्हाण,जितेंद्र कांबळे व वनरक्षक श्री. गायकवाड यांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी म.न.पा कॉलनी नं १० शेजारील नागझरी जवळ, भवानी पेठ पुणे या ठिकाणी सापळा लावला व बातमीच्या वर्णनाचा मुलगा सदर ठिकाणी दिसुन आल्याने त्यास स्टाफचे मदतीने झडप घालुन ताब्यात घेतले, सदर मुलास ताब्यात घेवुन त्याचे कडील पांढरे रंगाचे पोत्यातुन वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत शेडयुल ३ मधील प्रतिबंधीत मांडुळ सरपटणारा प्राणी ४० इंच लांबीचा, वजन पाऊण किलो मिळुन आला आहे. सदर मांडुळ याचे बाजार भाव किंमत पाच लाख रुपये आहे

सदर प्रकरणी खडक पो स्टे गुरन ३७ /२०१९ वन्यजीव संरक्षण कायदा सन १९७२ चे कलम २ (१६), ९, ४४, ५०, ५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. विधीसंघर्षग्रस्त बालकाने सदरची मांडुळ कोठुन आणले याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. सदर गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उप निरीक्षक श्री संजय पांढरे खडक पोलीस स्टेशन पुणे हे करीत आहेत.

सदरची कारवाई ही डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे ,श्रीमती. स्वप्ना गोरे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ व श्री. प्रदिप आफळे ,सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशन चे श्री. भरत जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.उत्तम चक्रे पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री.संजय पांढरे पोलीस उप निरीक्षक, पोलीस कर्मचारी रणजित घडशी, आशिष चव्हाण, जितेंद्र कांबळे यांनी केली आहे.

- Advertisement -