मुंबई : वर्सोव्यामध्ये महिलेला पाच वर्षे गुंगीसारखे औषध देत बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार 14 वर्षांपूर्वीचा असला तरीही आरोपीने पिडीत महिलेला तिचे फोटो नातेवाईकांमध्ये व्हायरल करण्याची धमकी देत 50 लाख रुपये उकळले आहेत. याबाबतची तक्रार पिडीत महिलेने वर्सोवा पोलिस ठाण्यात केली आहे. ही महिला सध्या 36 वर्षांची आहे. आरोपीने तिच्यावर 2005 पासून 2009 पर्यंत गुंगीसदृष्य औषध पाजत वारंवार बलात्कार केला होता. सध्या या आरोपीचे वय 54 वर्षे आहे. या पिडीत महिलेच्या नकळत त्याने शरीरसंबंधांवेळचे फोटो काढले होते. हे फोटो या महिलेला दाखवून त्याने ते मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये व्हायरल करण्याची धमकी दिली होती.
तसेच हे फोटो जर मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये व्हायरल करायचे नसल्यास बदल्यात 1 कोटी रुपये देण्याची मागणी केली होती. लाजेखातर महिलेने घाबरून त्याला 50 लाख रुपये घेतले होते. या प्रकाराची तक्रार संबंधीत महिला करण्यास गेली असता तिची रिक्षा अडवून मारहाण करत धमकावले होते. तसेच तिला घरात कोंडूनही ठेवण्यात आलेे होते.
यानंतर महिलेने धाडस करत वर्सोवा पोलिस ठाणे गाठत या 54 वर्षांच्या आरोपीविरोधात तक्रार दाकल केली आहे. या आरोपीविरोधात पोलिसांनी कलम 376,328, 384, 341, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मारहाण, बलात्कार, खंडणी अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.