Home गुन्हा पाथरीतुन सेलुकडे जात होता गुटखा : कंटेनरसह २४ लाख ५७ हजारांचा गुटखा पकडला

पाथरीतुन सेलुकडे जात होता गुटखा : कंटेनरसह २४ लाख ५७ हजारांचा गुटखा पकडला

0

पाथरीत पहाटे कंटेनरसह २४ लाख ५७ हजारांचा गुटखा पकडला

पाथरीतुन सेलुकडे जात होता गुटखा :-पोलिसांनी कंटनेर चालका सह एकाला केली अटक, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु

परभणी : पाथरीमार्गे-सेलुकडे नेण्यात येणारा २४ लाख ५७ हजार रुपयेकीमतीचा गुटखा, पानमसाला व लीलॅन्ड कंपनीचा ट्रक पाथरी पोलिसांनी पकडला. ही कारवाई पोलिसांनी १७ रोजी मध्यरात्रीनंतर पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास पाथरी मार्गे सेलुकडेे पाथरी शहरातील शिवाजी चौकात केली. याप्रकरणी ट्रक चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पाथरी मार्गे सेलुकडे
ट्रक क्रमांक (एम.एच- १२- के.पी-५०१५) मधून गुटखा, पानमसाला नेला जात असल्याची माहिती पाथरी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक शिंदे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने पाथरीमार्गे-सेलुकडे जाणारा गुटखा शहरातील शिवाजी चौकातून जात असताना पोलीसांनी पाठलाग पकडला १७ डिसेंबर रोजी पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास पोलिसांनी संशयित ट्रक अडवून चालकाकडे चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यांनी ट्रकचा मागील दरवाजा उघडला असता, त्यात प्लॅस्टिक पोत्यांमध्ये पान मसाल्याचा अवैध गुटखा आढळून आला.

पोलिसांनी ३० पोत्यांमधून प्रत्येकी छोट्या सहा पोत्यामधुन प्रती गोणी ५२ पाकीट प्रती पाकीट कींमत २६० असे एकुण ९४५० पाकीट २४ लाख ५७ हजार रुपयांचा गुटखा पकडला.
पाथरी तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक दीपक शिंदे,पो.हे.काॅ.विठ्ठल करे,चालक भगिरथ जाधव,अलीम शेख,सतीश साठे,प्र.सी.कच्छवे(अन्न व औषध) यांच्या पथकाने केली.
याप्रकरणी पाथरी तालुका पोलीसांनी अन्न व औषध प्रशासन अधिकारी अ.मा.तमडवार यांच्या फीर्यादी वरुन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया रात्री उशिरापर्यंत चालु होती. पाथरी पोलिसांनी अखील रसुल साब (वय ३२, रा.बसवकल्यान)हनुमंत कुपेंन्द्र गुरव(वय-३० रा-गोकुळ नगर कात्रज पुणे) या दोघांना ताब्यात घेतलेले आहे.