Home शहरे अमरावती पाथर्डीत रसायनापासून दारू बनवणाऱ्या कारखान्यावर छापा

पाथर्डीत रसायनापासून दारू बनवणाऱ्या कारखान्यावर छापा

0

अहमदनगर, पाथर्डी : शहराला लागून असलेल्या माळीबाभूळगाव ग्रामपंचायत हद्दीत शिक्षक कॉलनीतील देशी-विदेशी बनावटी दारूच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखा व पाथर्डी पोलीस यांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला. यामध्ये सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी विजय आव्हाड याच्या विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निक्षरीक दिलीप पवार यांना खबऱ्या मार्फत शिक्षक कॉलनीतील एका बंगल्यात देशी-विदेशी बनावटी दारूचा कारखाना चालू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीसानी बुधवारी दुपारी धाड टाकत सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये घटनास्थळी बनावट देशी दारूच्या बाटल्या, बनावट विदेशी मद्याच्या बाटल्या,बनावट गुटखा बनवण्यासाठी लागणारे तीन-चार मोठे मशीन,विविध दारू कंपन्यांचे नाव असलेले सीलबंद करण्याचे मशीन, झाकण,शेकडो रिकाम्या बाटल्या, हजारो पॉलिकॅप, देशी-विदेशी दारूचे रिकामे बॉक्‍स असे साहित्य पथकाने जप्त केले. कारखान्याचा मालक जांभळीचा माजी सरपंच विजय आव्हाड यास अटक केले असून याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान,सांयकाळी पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

पांगरमल विषारी दारूकाड घटना ताजी असताना गेल्या वर्षभरापासून महामार्गाला लागुनच घातक रसायनापासून बनावट दारू बनवली जात असताना याबाबत स्थानिक पोलिसांच्या काहीच खबर लागली नाही,आरोपी विजय आव्हाड याचेवर राज्यभर अनेक ठिकाणी बनावट दारू व गुटखा तयार करून विक्री करणे,चंदनचोरी यासह रोजगार हमी योजनेतील लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल असून दोन वर्षा पूर्वी एका पोलीस निरीक्षकांच्या संगनमताने कट करून सामाजिक कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचे प्रकरण सीआयडी तपासात निष्पन्न झाले आहेत.