घरी करतो नक्कल
सैफने एका मुलाखतीत बोलताना तैमूरबद्दल खास गोष्ट शेअर केली होती . ‘तैमूरच्या आसपास लहानपणापासून सतत पॅपराझी फोटो काढण्यासाठी असतात. तैमूरला त्याची गम्मत वाटते. तो लहान असल्याने आसपासच्या लोकांची नक्कल करण्याचा प्रयत्न करतो. आता तर तो मीडिया फोटोग्राफर्सची नक्कल करून दाखवतो. तो पापराझींना त्याच्या तोडक्या-मोडक्या शब्दात ‘मीडियावाले’ असं म्हणतो आणि माझा फोन हातात घेऊन त्यांच्यासारखे वागायचा प्रयत्न करतो. त्याचे फोटो काढण्यासाठी कॅमेरा जसा धरला जातो तसा तो माझा फोन हातात धरतो…फोनचा कॅमेरा आमच्यासमोर धरतो आणि ‘खिचिक, खिचिक’ असं तोंडाने म्हणत आमचे फोटो काढण्याचा प्रयत्न करतो.’
सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या आसपास जितके फोटोग्राफर दिसत नाहीत, तितके तैमूरच्या आसपास असतात. त्याची एक झलक दिसावी यासाठी सगळेच फोटोग्राफर मेहनत घेत असतात. त्यामुळे तैमूरचे फोटो, व्हिडिओ तुफान व्हायरल होतात.