Home गुन्हा पाबळच्या खुनाचा तब्बल चाळीस दिवसांनी छडा

पाबळच्या खुनाचा तब्बल चाळीस दिवसांनी छडा

0

शिक्रापूर : पाबळ (ता. शिरूर) येथील सावकारवस्ती या ठिकाणी चार डिसेंबर रोजी झोलल्या खुनचा छछडा तब्बल 40 दिवसांनी लावण्यात शिक्रापूर पोलियांना श आले आहे. या प्रकरणात तिघा बहिण-भावांना अटक करण्यात आली आहे.

कैलास हिरामण साळुंके, अक्षय हिरामण साळुंके व उज्वला हिरामण साळुंके अशी अटक केलेल्या भावंडांची नावे आहेत. त्यांनी राजू दिगंबर वाघमारे (रा. पाबळ) याचा खून केला. राजूची आई सुमन दिगंबर वाघमारे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पाबळच्या सावकार वस्ती येथे चार डिसेंबर रोजी कुजलेल्या अवस्थेतील बेवारस मृतदेह आढळून आला होता. त्याच्या हातावर गोंधलेले ीीप राना हे अक्षर आणि बदामाचे चिन्ह यावरून यावरून त्याचे नाव राजू दिगंबर वाघमारे असल्याचे समोर आले.

राजूच्या घरी चौकशी केली असता त्याचे गावातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते, त्यातून झालेल्या वादातून गावातील कैलास साळुंके व अक्षय साळुंके यांनी राजूला मारहाण केली होती. त्यांनतर काही दिवसांनी कैलास साळुंके व अक्षय साळुंके यांनी राजूच्या आईला तुमच्या मुलाला समजावून सांगा नाहीतर त्याचे हातपाय तोडून टाकू अशी धमकी दिली होती. या दोघांनी राजूला मारहाण व दमदाटी केली होती; परंतु याबाबत कोणतीही तक्रार देण्यात आलेली नव्हती. काही दिवसांनी पुन्हा एकदा कैलास साळुंके व अक्षय साळुंके यांनी राजूला मारहाण करत आता याची तिसरी वेळ झालेली असून याला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली.

राजू हा पाबळ गावातून शिक्रापूरच्या दिशेने जात असताना त्याच्या मागे कैलास साळुंके व अक्षय साळुंके हे दोघे व एक महिला जात असल्याचे एका महिलेने पाहिले होते, असे राजू वाघमारे यांच्या घरच्या व्यक्तींना त्या महिलेने सांगितले. त्यामुळे गावातील जुन्या भांडणाच्या वादातून राजूचा खून झाला असल्याबाबत राजूची आई सुमन दिगंबर वाघमारे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी कैलास हिरामण साळुंके, अक्षय हिरामण साळुंके व उज्वला हिरामण साळुंके या तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तिघांना देखील शिरूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 19 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.