Home गुन्हा पारगाव येथे 1 लाख 75 हजारांची दारू पकडली

पारगाव येथे 1 लाख 75 हजारांची दारू पकडली

मंचर: महाराष्ट्र राज्य सरकारचा कर चुकवून आणलेली दारू पारगाव तर्फे खेड (ता. आंबेगाव) येथे पकडण्यात आली. 1 लाख 75 हजार रुपयांचा बेकायदेशीर दारुसाठा उत्पादन शुल्क विभागाच्या नारायणगांव (ता. जुन्नर) येथील पथकाने छापा टाकुन जप्त केला. या प्रकरणी शिवाजी सावळेराम राक्षे याला अटक करण्यात आली आहे.

पारगांव येथे एका खोलीमध्ये हरियाणा राज्यात तयार झालेली विदेशी दारू उत्पादन शुल्क विभाग नारायणगावच्या पथकाने छापा टाकून जप्त केली आहे. याप्रकरणी शिवाजी सावळेराम राक्षे (रा. टाव्हरेवाडी, ता.आंबेगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्पादन शुल्क विभागाचे उपआयुक्त पी. पी. सुर्वे,अधीक्षक एस. बी. झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गणेश कुचेकर, एस. डी. झगडे, डी. डी .केक्रे, प्रसाद पाटील, आर. ए. पाचरणे यांनी कारवाई केली आहे. 444 दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कर न भरताच मद्यसाठा महाराष्ट्रात आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.