Home शहरे जळगाव पारोळा ; 1 मे 3 मे जनता कर्फ्यु

पारोळा ; 1 मे 3 मे जनता कर्फ्यु

जळगाव / पारोळा : प्रतिनिधी
पारोळा तालुक्यातील जोगलखेडा गावात दि 28/04/2020 रोजी भडगाव तालुक्यातील एक कोरोना पाॅझीटीव्ह इसम सासरवाडी जोगलखेडा येथे येऊन गेला.सदर घटनेची माहीती समजताच प्रशासनाकडून निकटच्या संपर्कातील 13 व्यक्तींना जळगाव येथे पाठविण्यात आले तर आजुबाजुच्या परीसरातील 41 जणांना पारोळा शहराबाहेरील विलगिकरण कक्षात हलविण्यात आले आहे.उपविभागिय अधिकारी तहसिलदार पारोळा,न.पा मुख्याधिकारी,पी.आय साहेब परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.जनतेने दि 1 मे 3 मे जनता कर्फ्यु नियमांचे काटेकोर पालन करावे,मास्क चा वापर करावा,कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच गावाबाहेरून व्यक्ती गावात आल्यास तत्काळ प्रशासनास माहीती द्यावी असे आवाहन प्रशासनाचे वतीने करण्यात आले आहे.