Home शहरे जळगाव पारोळ््यात घरफोडी- अडीच लाख लंपास

पारोळ््यात घरफोडी- अडीच लाख लंपास

0

पारोळा : येथील लालभाग या नवीन वसाहतीत अलका दत्तात्रय क्षत्रिय यांच्या बंद घराचे चोरट्यांनी कुलूप तोडून ३५ ग्रॅम सोन्यासह १ लाख २० हजार रोख पळविले. त्यामुळे जवळपास अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. ही घटना २७ रोजी घडली.
अलका यांचा मुलगा सचिन हा २७ रोजी बाहेरगावी गेला होता. त्यामुळे अलका या सचिनची पत्नी राधिका हिच्यासह शेजारी राहत असलेल्या सरिता क्षत्रिय यांच्याकडे घराला कुलूप लावून झोपण्यासाठी गेल्या होत्या. सकाळी दूध घेण्यासाठी अलका उठल्या असता त्यांना घराचा लोखंडी दरवाजा उघडा व आतील दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले. घरातील लोखंडी व लाकडी अशा दोन्ही कपाटांची लॉकर तोडून कपाटातील सर्व साहित्य अस्तवस्त केलेले होते. कपाटे तपासून पाहिले असता त्यात ठेवलेले सुमारे १ लाख ४० हजार किमतीचे ३५ ग्रॅम सोने व दुस-या कपाटातील रोख रक्कम १ लाख २० हजार रुपये चोरट्याने चोरून नेली.
याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.