बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : जिल्ह्यात आज 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना पोलीओ लसीकरण मोहिमेतंर्गत पोलीओचा डोस पाजण्यात आला. जिल्हास्तरीय शुभांरभ पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते जिल्हा सामान्य रूग्णालयात उपस्थित बालकाला पोलीओ लसीचे दोन थेंब पाजूण करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस, बाह्य संपर्क अधिकारी डॉ यास्मीना चौधरी, अधिसेविका श्रीमता कुलकर्णी, सहायक अधिसेविका श्रीमता कुरसिंगे, परिचारिका प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या श्रीमती खेडकर आदी उपस्थित होते.
- Advertisement -