अकोला,दि.17(जिमाका)- बाल अवस्थेपासून मुलांमध्ये संस्कार घडविणे आवश्यक असून राष्ट्रनिर्मितीकरिता महत्त्वाचे आहे. डॉ. उद्धवजी गाडेकर यांनी संत तुकडोजी महाराजांचे विचार बालअवस्थेपासूनच मुलांमध्ये रुजविण्याचे काम केले. त्यांचे हे काम मोलाचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी पाटसूल येथे केले.
अकोट तालुक्यातील पाटसूल येथे डॉ. उद्धवजी गाडेकर महाराज यांच्या परिवारास पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी सांत्वनपर भेट दिली. त्यांचे समवेत उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, बाबासाहेब गाढवे, तहसिलदार निलेश मडके, सौरभ खेळकर, आदी उपस्थित होते. प्रारंभी त्यांनी डॉ. उद्धवजी गाडेकर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन श्रद्धाजंली वाहिली. डॉ. उद्धवजी गाडेकर महाराजांचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार व मुलांमध्ये संस्कार घडविण्याचे कार्य मोलाचे असल्याचे प्रतिपादन कडू यांनी यावेळी केले.