पालघरच्या सना गोंसोलविस यांना राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक

पालघरच्या सना गोंसोलविस यांना राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक
- Advertisement -

पालघर दि. 27 : चेन्नई येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय युवा बॉक्सिंग अजिंक्य स्पर्धेत पालघरच्या युवा बॉक्सिंग पट्टू सना गोंसोलविस यांना अजिंक्य स्पर्धेत 70 किलो वजनी गटात कांस्यपदक मिळाले आहे.
. यास्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाला उपविजेते पदावरती समाधान मानावे लागलेआहे. तर महाराष्ट्राची बॉक्सिंग मध्ये कामगिरी सुधारत असताना पालघर जिल्ह्याच्याही कामगिरीमध्ये सुधारणा होत असल्याने क्रीडा क्षेत्रातून सना गोंसोलविस व क्रीडा प्रशिक्षकांचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी कौतुक केले.
पालघर जिल्हा क्रीडा संकुलात सध्या खेलो इंडियाचे बॉक्सिंग सेंटर सुरू आहे. या ठिकाणी 15 ते 20 खेळाडू बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेत आहेत. पालघरच्या प्रसाद पाटील तसेच विश्वास पवार यांच्या मार्गदर्शनाखालील युवा बॉक्सिंग खेळाडू आपला सराव करीत आहे. सना गोंसोलविस रूपाने पहिले पदक प्राप्त झाल्याने या ट्रेनिंग सेंटर खऱ्या अर्थाने महत्त्व प्राप्त झाले आहे. या ट्रेनिंग सेंटरचेे हे पहिले यश आहे
वसईतील वर्तक महाविद्यालयाच्या पदवीच्या पहिल्या वर्षाची ही विद्यार्थिनी असून 18 वर्षाखालील मुलींच्या गटात तिने कांस्यपदक प्राप्त केल्याने त्यांच्या कडून सुवर्णपदकाच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. आगामी काळातील खेलो इंडिया व विद्यापीठ स्पर्धेमध्ये श्रीमती गोंसालवीस सहभागी होणार आहेत
या राष्ट्रीय स्पर्धेत सना यांचा प्रवास खूप खडतर असाच होता. त्यांना पहिल्या फेरीत पंजाब सारख्या राज्यातील दशप्रीत या खेळाडूशी सामना करावा लागला.दशप्रीत यांच्या वरती थेट मात करत पुढच्या फेरीत हिमाचल प्रदेशच्या पारुल यांच्या वरती विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मात्र उपांत्य फेरीत त्यांचा सामना हरियाणा मधील व या स्पर्धेच्या सुवर्णपदक विजेत्या लसू यादव तिच्याशी झाला होता.लसू यादव हिने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर काही पदके मिळवली आहेत त्या या स्पर्धेचीप्रमुख दावेदार मानल्या जात होत्या .पालघर येथे बॉक्सिंग या खेळाचे ट्रेनिंग सेंटर सुरू होऊन वर्षभराचा कालावधीत लोटला आहे. पहिल्याच प्रयत्नात त्यांना राष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळाले आहे.जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांनी श्रीमती गोंसालवीस यांचे अभिनंदन केले.

- Advertisement -