पालघरमधील वाडा येथे शाळेच्या बसचा अपघात, 50 विद्यार्थी जखमी

- Advertisement -

पालघर: वाडा ते शहापूर तालुक्यातील पिवळी गावापर्यंत महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या वाडा आगाराची बससेवा सुरू आहे. पिवळीहून वाड्याच्या दिशेने भरधाव वेगाने येत असताना जांभूळपाडा नजीक गतीरोधकावर आदळल्याने चालकाचा ताबा सुटून बसचा अपघात झाला. या अपघातात सुमारे पन्नास विद्यार्थी जखमी झाले. यापैकी दोन गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी ठाणे येथील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

- Advertisement -