Home शहरे मुंबई पावसाळ्याच्या तोंडावर घरांवर आस्मानी संकट

पावसाळ्याच्या तोंडावर घरांवर आस्मानी संकट

0
पावसाळ्याच्या तोंडावर घरांवर आस्मानी संकट

[ad_1]

म.टा.वृत्तसेवा, ठाणे

गेल्या वर्षी चक्री वादळाने तडाखा दिलेल्या मुरबाड तालुक्यातील आदवासी वाड्या वस्त्यांना यंदा गारपिटीसह पडलेल्या मुसळधार पावसाने झोडपून काढले. रविवारी संध्याकाळी सोसाट्याच्या वाऱ्यांसह झालेला पाऊस आणि गारपीट इतकी जोरदार होती की अनेकांच्या घरावरील कौले फुटली. खिडक्यांच्या काचा निखळल्या. अंगणात गारांचा अक्षरश: ढीग झाला होता. उन्हाळ्याच्या दिवसात आदवासी कुटुंबे परसदारी काही भाजीपाला, फळभाज्यांची लागवड करतात. ते सर्व या गारपिटीत नष्ट झाले.

ठाणे जिल्ह्याच्या सीमेवरील आल्याचीवाडी, मेर्दी, मोधळवाडी, केळेवाडी, वाल्हीवरे, धारर्खिड आणि बांडेशेत आदी गावांमध्ये ही भयानक गारपीट झाली. खरेतर मे महिन्याच्या या काळात आदिवासी बांधव आपल्या घरांची दुरुस्ती, शेतीच्या कामांची पूर्वतयारी करतात. करोना संसर्गामुळे सध्या त्यांची मजुरी बंदच आहे. त्यात पावसाच्या तोंडावर मोडलेल्या घरांची दुरुस्ती कधी आणि कशी करायची, अशा विवंचनेत आदिवासी आहेत.

शासकीय नियमांप्रमाणे तत्परतेने या नुकसानीचे पंचनामे होतील. परंतु करोनाच्या या महामारीत शासकीय मदत वेळेत पोहोचण्याची शक्यता नाही. गेल्या वर्षी जून महिन्यात निसर्ग चक्रीवादळ झाले. त्याआधीही मुरबाडमध्ये काही वादळे झाली, त्यात काही आदिवासी वस्त्यांमधील घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परंतु त्यांना अद्याप मदत मिळू शकलेली नाही. ती मदत लवकरात लवकर देण्यात यावी, असे आवाहन श्रमिक मुक्ती संघटनेने केले आहे.

[ad_2]

Source link