Home मनोरंजन पासपोर्टच्या मुद्द्यावरून भडकलेल्या कंगनानं आमिर खानवर काढला राग, म्हणाली…

पासपोर्टच्या मुद्द्यावरून भडकलेल्या कंगनानं आमिर खानवर काढला राग, म्हणाली…

0
पासपोर्टच्या मुद्द्यावरून भडकलेल्या कंगनानं आमिर खानवर काढला राग, म्हणाली…

[ad_1]

हायलाइट्स:

  • कंगनाचा पासपोर्ट रिन्यू करण्यास पासपोर्ट ऑफिसनं दिला नकार
  • न्यायालयानं पासपोर्टसंबंधी याचिकेची सुनावणी पुढे ढकलल्यावर भडकली कंगना
  • पासपोर्टच्या मुद्द्यावरून भडकलेल्या कंगनानं आता आमिर खानवर साधला निशाणा

मुंबई: अभिनेत्री कंगना रणौत सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेचा विषय ठरणार कंगना आता मात्र पासपोर्ट रिन्यूअलच्या मुद्द्यावरून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. कंगनाला तिचा आगामी चित्रपट ‘धाकड’च्या शूटिंगसाठी १५ जून ते २० ऑगस्ट २०२१ या कालावधीत हंगेरी बुडापेस्ट येथे जायचं होतं. पण त्यासाठी ती जेव्हा पासपोर्ट ऑफिसला गेली तेव्हा पासपोर्ट रिन्यू करण्यासाठी त्यांनी तिला न्यायालयाची परवानगी घेऊन येण्यास सांगितलं. त्यानंतर कंगनानं न्यायालयात धाव घेतली मात्र तिथूनही तिला कोणतीच मदत मिळाली नाही. उच्च न्यायालयानं ही सुनावणी २५ जून पर्यंत पुढे ढकलली आहे. याचा राग आता कंगनानं सोशल मीडियावरून व्यक्त केला आहे. आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आता तिनं या वादात आमिर खानला देखील ओढून घेतलं आहे.

कंगना रणौत

आपल्या पोस्टमध्ये कंगनानं लिहिलं, ‘महाविनाशकारी सरकारनं पुन्हा मला त्रास देण्यास सुरुवात केली आहे. माझी पासपोर्ट रिन्यूअलची याचिका नाकारण्यात आली आहे. कारण कोणी टपोरी- रोडसाइड रोमियोनं माझ्याविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल केला आहे. न्यायालयानं माझ्या पासपोर्ट रिन्यूअलच्या याचिका नाकारली आणि ही याचिका अस्पष्ट असल्याचं कारण दिलं आहे.’ ही पोस्ट कंगनानं कू अॅपवर लिहिली होती.


कू अॅपवरील पोस्टवरील हीच पोस्ट कंगनानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करताना कंगानानं लिहिलं, ‘जेव्हा आमिर खान भाजपाच्या विरोधात बोलला होता आणि त्यानं असहिष्णुतेवर वक्तव्य केलं होतं. त्यावेळी कोणी त्याच्या चित्रपटाचं शूटिंग थांबवलं नव्हतं. कोणी त्याच्या पासपोर्टवर बंदी आणली नव्हती. मी फक्त हे सांगत आहे.’

लॉकडाउनमध्ये कंगना झाली कंगाल; म्हणाली, काम नाहीए आणि सरकार व्याज घेतंय
मुंबई उच्च न्यायालयानं कंगनाच्या याचिकेवर सुनावणी करताना तिची याचिका चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. जर पासपोर्टची वैधता संपलेली आहे तर मग अखेरच्या काळात याचिका का दाखल करण्यात आली असा सवाल उच्च न्यायालयानं केला आहे. दरम्यान रिजनल पासपोर्ट ऑफिसनं कंगनाच्या पासपोर्टवर आक्षेप घेत तो रिन्यू करण्यास नकार दिला होता. ज्यानंतर कंगनानं न्यायालयात याचिका दाखल केली होती.



[ad_2]

Source link