काय लिहिलं आहे सिद्धार्थची पोस्ट?
आमच्या बिल्डिंगच्या मागे आज एक पाहुणा आला होता. बराच वेळ आमच्याकडे टक लावून बघत बसला आणि झुडपात निघून गेला. त्याच्या चेहऱ्यावर एक जखम दिसली. ‘तुमच्यामुळे झालंय हे’ असं नजरेतून सांगत होता. बिल्डिंग मधले सगळे फोटो काढायला खिडकीत आले. मी पण आलो. तो फक्त स्थिर नजरेनं बघत होता आमच्याकडे. त्याचा नजरेतून कळत होतं स्पष्ट की पाहुणा तो नाही, आम्ही आहोत. हे त्याचं घर आहे.
तसंच मितालीनं देखील ‘पाहुणा कोण? मी? की तुम्ही?’, असं लिहित बिबट्याच्या डोळ्यातील प्रश्न स्वत:ला विचारला आहे.