Home गुन्हा पाहुणी म्हणुन आली आणि डल्ला मारुन गेली आणि तिजोरी खाली

पाहुणी म्हणुन आली आणि डल्ला मारुन गेली आणि तिजोरी खाली

0

बोरघर / माणगाव 🙁 विश्वास गायकवाड ) पाहुणी म्हणून आलेल्या संशयित महिलेने , त्या घरातील बंद कपाटातील सुमारे साडेतीन लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना ५ आँक्टोबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी गोरेगांव पोलीस ठाण्यात या संशयित महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोरेगांव पोलीस ठाण्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी स्मिता सुरेश गुजर (वय ६२, रा. माधव काँम्प्लेक्स, डी.विंग, रूम नं.१०१, गोरेगांव) यांनी आपल्या घरातील बेडरूममधील कपाटातील प्लास्टीकच्या डब्यात दोन तोळे वजनाचे सोन्याचे कानातील झुमके अंदाजे किंमत रु. ७६ हजार, चार तोळे वजनाचा १ लाख ५२ हजार रुपये किंमतीचा सेान्याचा हार, पण्डल असलेली ३ तोळे वजनाची १ लाख १४ हजार रुपये किंतमीचा सोन्याचा हार आणि त्यांच्या मुलाने रुपये दोन हजार ठेवले होते, मात्र कपाटाला लाँक केले नव्हते.
संशयित महिला नैना सुरेश मेहता (रा. रोहा) ही बेडरूूममध्ये साडी नेसण्यासाठी गेली असता, तिने हे दागिने लंपास केले.
गोरेगांव पोलीस ठाण्यात या संशयित महिलेविरोधात भा. दं. वि. कलम ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणी पोलीस निरीक्षक श्री. टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार व्ही. आर. ठाकूर हे अधिक तपास करित आहेत.