Home शहरे पुणे पिंपरीच्या महापौरपदी भाजपच्या उषा ढोरे यांची बहुमताने निवड

पिंपरीच्या महापौरपदी भाजपच्या उषा ढोरे यांची बहुमताने निवड

0

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौरपदी सांगवीचे प्रतिनिधीत्व करणा-या भाजपच्या उषा उर्फ माई ढोरे यांची बहुमताने निवड झाली. त्या शहराच्या 26 व्या तर सातव्या महिला महापौर झाल्या आहेत. त्यांना 81 मते पडली. तर, राष्ट्रवादीच्या स्वाती उर्फ माई काटे यांचा पराभव झाला. त्यांना 41 मते पडली.  दरम्यान, अपक्षांनी भाजपला तर शिवसेनेने राष्ट्रवादीला मतदान केले. मनसेने तटस्थ भुमिका घेतली.

पीठासीन अधिकारी म्हणून पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शांतनु गोयल यांनी कामकाज पाहिले.  सकाळी अकरा वाजता निवडणुकीला सुरूवात झाली. त्यांनी महापौरपदाच्या अर्जांची छाननी केली. माघारीसाठी 15 मिनीटांचा वेळ दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माई काटे यांनी माघार घ्यावी, यासाठी सभागृह नेते एकनाथ पवार यांनी प्रयत्न केले. परंतु, ते निष्फळ ठरले. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली.