Home ताज्या बातम्या पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारीची संख्या वाढली – पोलीस आयुक्त आर.के पदमनाभन 

पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारीची संख्या वाढली – पोलीस आयुक्त आर.के पदमनाभन 

0

पुणे : परवेज शेख

स्वतंत्र पोलीस आयुक्तालय होऊन १५ ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र, गुन्हेगारीचा चढता आलेख हा कमी होताना दिसत नाही. स्वतः पोलीस आयुक्त आर.के पदमनाभन यांनी गुन्हेगारी वाढल्याचे मान्य केले आहे. तर दुसरीकडे मनुष्यबळ आणि वाहांनासाठी पोलीस आयुक्त शासन दरबारी झगडत आहेत. यावर्षी खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, दरोडा,जबरी चोरी आणि विनयभंगाच्या अनेक तक्रारींची नोंद झाली आहे. त्यामुळे या वर्षात गुन्हेगारी वाढल्याचे चित्र आहे.

अनेक प्रयत्नानंतर स्वतंत्र पोलीस आयुक्तालय पिंपरी-चिंचवड शहराला मिळाले, प्रथम पोलीस आयुक्त म्हणून आर.के पदमनाभन यांनी पदभार स्वीकारला. पहिल्या काही महिन्यात त्यांनी आयटी पार्ककडे जाणाऱ्या मार्गावर बदल करून आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली.

मात्र, त्यानंतर अंतर्गत वाद, अधिकाऱ्यांची गटबाजी हे दिसू लागले. यामुळे पोलीस कर्मचारी नाराज असल्याचे चित्र वारंवार समोर आले आहे. तर दुसरीकडे वाहन तोड फोडीचे सत्र, खून, दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न या घटनांनी चांगलंच तोंड वर काढले आहे. यामुळे शहरातील वातावरण भीतीयुक्त झाले आहे.

दरम्यान, आज पोलिस आयुक्त आर.के. पदमनाभन म्हणाले की, वर्षपूर्ती होत असताना अनेक अडचणी आल्या. त्यात मनुष्य बळ आणि अपुरे वाहन संख्या याचा समावेश आहे. मात्र, आम्ही लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्याचे समाधान आहे. सध्या, गुन्हेगारी आकडेवारी जर पाहिली तर आकडा जास्त दिसणारच. गुन्हेगारीची संख्या वाढली आहे कारण आम्ही प्रत्येक गुन्ह्याची नोंद करत आहेत. मात्र मोका, तडीपार या सारख्या कारवाई देखील अनेकदा केलेल्या आहेत असे पोलीस आयुक्त म्हणाले