पिगाससच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नेत्यांवर पाळत?; संजय राऊत म्हणतात

पिगाससच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नेत्यांवर पाळत?; संजय राऊत म्हणतात
- Advertisement -

हायलाइट्स:

  • पिगासस यंत्रणेच्या माध्यमातून फोन टॅप?
  • विरोधी पक्षनेते, पत्रकारांचे फोन टॅप केल्याचा संशय
  • शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया

मुंबईः संसदेच पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यानंतर पेगाससच्या मुद्द्यावरुन वातावरण तापलं आहे. हेरगिरीसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘पिगासस’(Pegasus Snoopgate) यंत्रणेच्या डेटाबेसमधील काही माहिती फुटली असून, त्यात अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचे फोनक्रमांक आढळले आहेत. या सगळ्यांचेच फोन हॅक झाल्याचा संशय त्यामुळे बळावला आहे. या मुद्द्यावरुन संसदेत वातावरण तापलं असून शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनीही यावर भाष्य केलं आहे.

‘देशातील अनेक बड्या लोकांचे फोन टॅप केले गेल्याची माहिती आहे. अश्विनी वैष्णव मंत्री आहेत तरीही त्यांचा फोन टॅप होतो. ते मंत्री नसतानाही त्यांच्यावर पाळत ठेवली जाते. पिगाससच्या सहाय्याने बड्या नेत्यांचे, पत्रकारांचे फोन टॅप आणि हॅक केले गेलेत. यामागे आंतरराष्ट्रीय ताकद आहे, असं सांगणं केंद्रानं बंद करावे,’ असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

वाचाः ‘हे बा विठ्ठला, जसे मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत तुझ्या भेटीला आले तसेच…’

‘फोन टॅपिंग हे इस्त्राइलमधून करण्यात आलंय. इस्त्रालय भारताचा चांगला मित्र आहे. इस्त्रालयचे नेत्यानाहू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मिठ्या मारतानाचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. नेत्यानाहूंच्या प्रचाराच्या वेळी मोदींचे पोस्टर लावलेले जगाने पाहिलेत. त्यामुळं पिगाससचा भारतीय लोकशाहीला धोका आहे आणि देशाची बदनामी आहे हे त्यांनी आम्हाला सांगू नये,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

वाचाः अदानींच्या ताब्यात येताच मुंबई विमानतळाचे मुख्यालय अहमदाबादला

‘महाराष्ट्रात अशी तंत्रज्ञान आणि यंत्रणा आम्हाला रोखण्यासाठी वापरली गेली आणि आजही वापरली जात असावी. हे फार मोठं षडयंत्र आहे आणि सरकारी मदतीशिवाय अशा प्रकारचं धाडस कोणी करु शकत नाही, असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. या देशात आता कुणी सुरक्षित नाही. आमचे फोन सगळे ऐकतात, असं आता नागरिकांनाही वाटू लागलंय. त्यामुळे आमच्यावर पाळत ठेवली आहे अशी त्यांची भावना आहे. मोदी, शाह यांनी समोर यावे आणि याचे उत्तर द्यावे,’ अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

Source link

- Advertisement -