Home गुन्हा पि.एम.पि एम.एल बस मध्ये ज्येष्ठ महिलांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद

पि.एम.पि एम.एल बस मध्ये ज्येष्ठ महिलांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद

0

पुणे-परवेज शेख

गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी गजानन पवार यांना
मिळालेल्या माहीतीवरुन पुणे स्टेशन पि.एम.पि.एम.एल, बस स्टॉप वरुन बस मध्ये चढण्याचे तयारीत असलेले टोळीला गुन्हे
शाखा,युनिट २ चे टिमने ताब्यात घेतले व त्यांचेकडे तपास करता त्यांनी पुणे स्टेशन, स्वारगेट, शिवाजीनगर अशा गर्दी
असलेल्या बस स्टॉपकडे येणाऱ्या लॉगरुटच्या बसेस मध्ये चढून सदर बस मधील जेष्ठ किंवा एकट्या महिला अथवा इसमांना
हेरुन टोळीने त्यास घेरुन गर्दीचा फायदा घेवन गळ्यातील दागिने, हातातील पाटल्या आणि पर्समधिल पैसे व दागिने चोरी
केल्याचे सदर टोळीतील इसमांनी कबुल केलेने त्यांचेकडुन तपासदरम्यान बंडगार्डन, स्वारगेट, शिवाजीनगर, वानवडी या
पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या एकुण १४ गुन्ह्याची उकल गुन्हे शाखेने केली. तपासदरम्यान 4,06,600/-
रुपये किमतीचे 107 ग्रॅम वजानाचे सोन्याचे दागिने व ३० हजार रुपये रोख रक्कम असा एकुण 4,36,600/-रु चा
मुद्देमाल आरोपींकडुन जप्त करण्यात आली आहे. सदर टोळीमधील
1)कृष्णा ऊर्फ आण्णा पोपटराव गव्हाणे वय २४ वर्षे
2)आकाश ऊर्फ आक्या शिवाजी अहिवळे वय २० वर्षे
3) मंगेश ऊर्फ मंग्या सुरेश उकरंडे वय १८ वर्षे
4) सुरज किशोर सोनवणे वय २१ वर्षे
5)हुकुमसिंग राजसिंग भाटी, वय ४७ वर्षे

(माल घेणारा) या इसमांना अटक करण्यात आली असुन सुरज सोनावणे हा या टोळीचा प्रमुख आहे.सदर आरोपीवर पुर्वी
देखिल अशाच प्रकारचे गुन्हे केल्याने गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपींनी आणखीन पि.एम.पि.एम.एल बसमध्ये चोरीचे गुन्हे
केल्याचे सांगितले असून सदर तपास गुन्हे शाखा, युनिट २ करीत आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयक्त्त, गन्हे, श्री अशोक मोराळे. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री बच्चन सिंग,सहा पोलीस आयुक्त, डॉ शिवाजी पवार यांचे मार्गदर्शनाप्रमाणे गन्हे शाखा युनिट 2) चे पोलीस निरीक्षक गजानन पवार, सपोनि जयवंत जाधव, पोउपनि नितिन शिंदे, पोलीस कर्मचारी संजय दळवी. यशवंत आंब्रे, अनिल ऊसलकर, शेखर कोळी, दिनेश गडांकुश, अस्लम पठाण, विनायक जाधव, अतुल गायकवाड, चेतन गोरे, विशाल भिलारे, उत्तम तारु,विवेक जाधव,स्वपनिल कांबळे, कादीर शेख, अजित फरांदे, मितेश चोरमले व गोपाळ मदने यांनी केलेली आहे.