‘पीआरएसआय’चा २१ एप्रिल हा स्थापना दिवस ‘राष्ट्रीय जनसंपर्क दिन’ म्हणून साजरा करणार – महासंवाद

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली नसरापूर घटनेतील पीडित कुटुंबीयांची भेट – महासंवाद
- Advertisement -


नागपूर, दि. 10 : पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडियाच्या नागपूर शाखेतर्फे दिनांक २१ एप्रिल हा राष्ट्रीय जनसंपर्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी, ‘जनसंपर्क हा लोकशाहीचा पाचवा स्तंभ’, ही या दिनाची संकल्पना आहे. या विषयावर रविभवन येथे दिनांक २१ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता जनसंपर्क दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण माहिती संचालक डॉ. गणेश मुळे यांना यावेळी देण्यात आले.

पीआरएसआय नागपूर शाखेतर्फे जनसंपर्क आणि पत्रकारिता या विषयावर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. शासकीय तसेच नीमशासकीय आस्थापनांमधील जनसंपर्क अधिकाऱ्यांना माध्यम क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञाना संदर्भात याद्वारे अवगत करण्यात येते. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी विनायक महामुनी, नागपूर विभागाचे मुख्य माहिती आयुक्त गजानन निमदेव यांना विशेष अतिथी म्हणूंन निमंत्रित केले आहे.

पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया (पीआरएसआय) च्या नागपूर शाखेतर्फे हिंदी पत्रकारितेला दोनशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित सोहळ्यात माहिती व जनसंपर्क संचालक डॉ. गणेश मुळे यांच्या ‘क्रांतिकारी पत्रकार : बापुराव विष्णू पराडकर’ या पुस्तकाचे लोकार्पण व त्यावर चर्चा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ३० मे रोजी हिंदी मोर भवन येथे आयोजित केला आहे.

पीआरएसआयच्या नागपूर शाखेततर्फे आज माहिती संचालक डॉ. गणेश मुळे यांची भेट घेऊन त्यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले.

यावेळी पीआरएसआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एस.पी. सिंग, नागपूर शाखेचे उपाध्यक्ष अखिलेश हळवे, सचिव मनीष सोनी, वरिष्ठ सदस्य अनिल गडेकर उपस्थित होते.

हिंदी पत्रकारितेला दोनशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त माहिती संचालक डॉ. गणेश मुळे यांनी लिहिलेल्या ‘क्रांतिकारी पत्रकार : बापुराव विष्णू पराडकर’ या पु्तकाचे लोकार्पण व पराडकर यांची पत्रकारिता या विषयावर डॉ. मुळे मार्गदर्शन करणार आहेत. माहिती व जनसंपर्क विभाग तसेच पीआरएसआय नागपूर चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारितेच्या क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञाना संदर्भात संयुक्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष एस.पी. सिंग यांनी दिली.

००००

- Advertisement -