पुणे : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यात पोलीस प्रायव्हेट सेक्युरिटी पार्टनरशिप प्रोग्राम (पी-४) यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व खाजगी सुरक्षा रक्षक संस्थेचे प्रबोधन करून त्यांना महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम १९८१ आणि महाराष्ट्र खाजगी सुरक्षा संस्था अधिनियम २००५ व नियम २००७ या कायद्याचे महत्व पटवून दिले. या कार्यशाळेमुळे चालक व मालकांचा चेहरामोहरा बदलवून गेला. मालकांना व त्यांच्या कर्मचार्यांना कर्तव्यदक्ष व अतिसंवेदशील आणि अत्याधुनिक गोष्टींचा वापर कशाप्रकारे करायचा यांचे प्रशिक्षण देण्यात आले.

पुणे मा. पोलीस आयुक्त डॉ . के. वेंकटेशम (भापोसे), मा. पोलीस सह-आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे (भापोसे) मा. अपर पोलीस आयुक्त मा.अशोक मोराळे (भापोसे) यांनी केलेल्या मार्गदर्शनाने व पी-४ या उपक्रमाच्या साह्याने सर्वच क्षेत्रातील गुन्हेगारीची तात्काळ माहिती तसेच गुन्हेगारांवर सतर्क नागरिकांची काय भूमिका असली पाहिजे तसेच शहरातील सर्व पोलीस ठाण्यात पी-४ च्या साहयाने माहितीची देवाण घेवाण करणे शक्य आहे असे झालेल्या बैठकामधून सांगण्यात आले आहे.
विविध समाजोपयोगी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याच्या माध्यमातून पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात नियोजनबद्ध आणि निर्णयात्मक खाजगी सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या मालकांना सोबत घेऊन त्यांच्याच सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी पोलीस प्रायव्हेट सेक्युरिटी पार्टनरशिप प्रोग्राम (पी-४) या उपक्रमाच्या मदतीने पोलीस अधिकारी व चालक मालक यांचा सवांद वाढविण्यासाठी चौथे (४) चर्चासत्र संपन्न झाले. त्यात काही नामांकित मालकांचा व पी-४ च्या यशोगाथेचा गौरव करण्यात आला.

या चर्चासत्राला पुणे,सातारा,कोल्हापूर जिल्ह्यातील सुरक्षा रक्षक सेवा पुरवठादार संस्थेचे पन्नासपेक्षा अधिक मालक आणि चालक उपस्थित होते .

पी-४ मधील कोर कमिटी व व्यवस्थापन कमिटी महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) योजना २००२ तसेच खाजगी सुरक्षा संस्था मध्यवर्ती आदर्श नियम २००६ या कायद्याचे जे पालन करणार नाही यांची माहिती मा.कामगार आयुक्त यांना वेळोवेळी सादर करणार आहे.

पी-४ च्या माध्यमातून जिल्यातील १२३८ सुरक्षा एजेन्सीच्या मालकांना एकत्रीत करून पोलीस प्रशासनासोबत सुरक्षा सेवेच्या कर्तव्याबरोबरच सामाजिक उपक्रम राबविण्याचे काम देखील पी-४ करणार आहेत असे पी-४ चे मुख्य समन्वयक सचिन मोरे यांनी मनोगतात सांगितले.