Home ताज्या बातम्या पी-४ कडून चोख बंदोबस्त राखण्यास मदतीचा हात

पी-४ कडून चोख बंदोबस्त राखण्यास मदतीचा हात

पुणे :प्रतिनिधी संगमसिंग टाक,

झपाट्याने पसरणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन लागू केला आहे. याकाळात देशभरात सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुण्यातही १८० ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे घराबाहेर पडणाऱ्या आणि याठिकाणी येणाऱ्या नागरिकांचे ओळखपत्र तपासले जात आहेत. लॉकडाऊन जाहीर केल्यापासून पुणे पोलिसांनी आतापर्यंत हजारो वाहने जप्त केली आहेत. तसेच विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येत आहे.

संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या हजारो जणांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे. पुणे शहर या कार्यक्षेत्रात स्वयंसेवक म्हणून पी-४ मधील श्री. राज राठोड मालक स्वतः बंदोबस्तात सहभागी झालेले दिसले. तसेच त्यांचे सुरक्षा रक्षक वेगवेळ्या आस्थापनेत कर्तव्यावर आहेत. विश्रांतवाडी चौक, शास्त्रीनगर चौक, विमान नगर चौक, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन ठिकणी नाकाबंदी मध्ये कर्तव्य करताना पोलीस कर्मचारी श्री. प्रफुल मोरे सर्व कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहे.तसेच कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना चहा,फळे,पाणी,मास्क…इ वाटप करताना दिसून आले. अप्पर पोलीस आयुक्त श्री.अशोक मोराळे साहेब पुणे शहर यांनी पी-४ चे कौतुक केले. या बंदोबस्तात खास करून मे. रिलायबल एच आर फॅसिलिटी प्रायव्हेट लिमिटेड. सुरक्षा संस्थेच्या मालकांनी सुरक्षित पुणे करण्यासाठी खारीचा वाटा उचलेला आहे दिसून आले. पी-४ मुख्य समन्वयक यांनी सांगितले कि १४ एप्रिल पर्यंत किंवा अजून हि काही कालखंड आम्ही तन-मन-धन देऊन पुणे पोलिसांच्या समवेत दिवस रात्र कर्तव्य करून पुणे जिल्ह्याला सुरक्षित करण्यासाठी प्रशासनाच्या आदेश प्रमाणे कर्तव्य करणार आहोत.