Home ताज्या बातम्या “पी-४” कडून पुणे ग्रामीण पोलिसांना सुरक्षा साधनाचे वाटप

“पी-४” कडून पुणे ग्रामीण पोलिसांना सुरक्षा साधनाचे वाटप

0

पुणे- प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असताना पुणे ग्रामीण कार्यक्षेत्रातील लोणीकंद, शिक्रापूर, रांजणगाव एमआयडीसी व शिरूर पोलीस स्टेशन आणि हद्दीतील ३० नाकाबंदी ठिकाणी रात्रंदिवस कार्यरत असलेल्या पोलीस बांधवाना, सुरक्षा कर्मचारी यांना “पी-४ मधील अधिकृत खाजगी सुरक्षा संस्थेच्या माध्यमातून एक सामाजिक बांधिलकी जपत पी. पी.ई किट व पाणी वाटप करण्यात आले.

लोणीकंद पो.स्टे चे व.पो.नि.मानकर साहेब, शिक्रापूर स्टे चे व.पो.नि.शेलार साहेब, रांजणगाव पोलीस स्टेशन चे एपीआय श्री. पाटील साहेब तसेच शिरूर पोलीस स्टेशन चे एएसआय श्री.कोलते साहेब यांनी पी-४ च्या संस्थेच्या कार्याचे तोंडभरून कौतुक करून सुरक्षा सेवाकार्याची प्रशंसा केली यावेळी त्यांनी तेथील स्वयंसेवकांशी संवाद साधून त्यांचा उत्साह वाढविला.

पी-४ च्या अधिकृत संस्थेच्या जिल्यातील १२९ सुरक्षा एजेन्सीच्या मालकांना एकत्रीत करून पोलीस प्रशासनासोबत सुरक्षा सेवेच्या कर्तव्याबरोबरच सामाजिक उपक्रम राबविण्याचे काम देखील पी-४ च्या माध्यमातून करीत आहेत असे पी-४ चे मुख्य समन्वयक सचिन मोरे यांनी सांगितले.

अत्यावश्यक सेवेमधील सुरक्षा कर्मचार्यांकडून ती खबरदारी घेण्यासाठी जी जबाबदारी घेतली आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या साह्याने सर्व ठिकाणी साधने पोचवत आहोत. म्हणून प्रत्येकी पोलीस ठाण्याला २० बॉक्स पाणी, १५ ली सेनीटायझर, १०० मास्क देण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन शाखा यांच्या माध्यमातून करोना आजाराचे संक्रमण थांबविण्यासाठी या विषाणूंचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखणेसाठी अत्यावश्यक उपाय योजने मध्ये पुणे जिल्ह्यातील पोलीस प्रायव्हेट सिक्युरिटी पार्टनरशीप प्रोग्रॅम (पी-४) च्या माध्यमातून जवळपास सर्व पोस्ट वरती सुरक्षा कर्मचारी दिवसरात्र पोलीस कर्मचार्याच्या सोबत कर्तव्यावर दिले आहेत.

या वाटप प्रसंगी पी-४ संस्थेचे सर्व समन्वयक उपस्थित होते, खाजगी सुरक्षा संस्थेच्या मालकांनी सुरक्षित पुणे करण्यासाठी या महासंकटसमयी करीत असलेल्या कार्याला तोड नाही. भविष्यात जर गरज पडली तर पी-४ पुन्हा काही संसाधने उपलब्ध करून देईल, असा विश्वास सर्व चालकांनी त्यावेळी व्यक्त केला.

या वाटपप्रसंगी संभाजी उकिरडे,संभाजी बुचडे,दिनेश रायकवार,विष्णू जाधव,मनेश घुले,बालाजी माने,ज्ञानेश्वर चोरघे,सुरेश डाळींमकर याच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला. किंमतीलाल शर्मा,तानाजी भोसले,प्रवीण भोसले,प्रवीण ढोकले,प्रवीण वाळके,संदीप शिवले,प्रकाश लोले,शरद काळे,शरद शिंदे, शिवशरण सर, ज्ञानेश्वर गायकवाड,किशोर जाधव,किशोर जाधव,अनिल बेंद्रे,मनोज चौगुले,दिलीप क्षेत्रे,..इ उपस्थित होते.