Home शहरे पुणे पी-४ कडून मदतीचा हात

पी-४ कडून मदतीचा हात

पुणे – झपाट्याने पसरणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन लागू केला आहे. याकाळात देशभरात सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुण्यातही १८० ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे घराबाहेर पडणाऱ्या आणि याठिकाणी येणाऱ्या नागरिकांचे ओळखपत्र तपासले जात आहेत. लॉकडाऊन जाहीर केल्यापासून पुणे पोलिसांनी आतापर्यंत हजारो वाहने जप्त केली आहेत. तसेच विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येत आहे. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या हजारो जणांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे.पुणे शहर, पिंपरी-चिंचवड तसेच पुणे ग्रामीण या कार्यक्षेत्रात जवळपास स्वयंसेवक म्हणून पी-४ मधील ६०-६५ मालक स्वतः बंदोबस्तात सहभागी झालेले दिसले.


तसेच त्यांचे १८ हजारापेक्षा अधिक सुरक्षा रक्षक वेगवेळ्या आस्थापनेत कर्तव्यावर आहेत.

सर्व ठिकणी नाकाबंदी मध्ये कर्तव्य करताना पोलीस कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना चहा,फळे,पाणी,मास्क…इ वाटप करताना दिसून आले. अप्पर पोलीस आयुक्त श्री.अशोक मोराळे साहेब पुणे शहर तसेच सह-पोलीस आयुक्त श्री.रामनाथ पोकळे साहेब पिंपरी-चिंचवड यांनी पी-४ चे कौतुक केले.

या बंदोबस्तात खास करून

मे. भारत शिल्ड फोर्स प्रा. ली, मे. रिलायबल एच आर फॅसिलिटी, मे. कॉर्डन सिक्युरिटी अँड अलाईड सर्व्हिसेस प्रा. ली, मे. के सम्राट ग्रुप,मे. अशोक फॅसिलिटी सर्व्हिसेस,मे. एस एम डब्लु मार्शल सिक्युरिटी प्रा. ली,मे. भोसले ग्रुप,मे. एस के असोशिएट,मे. एस जे फॅसिलिटी मॅनेजमेंट, मे. एन एस पी एस प्रा ली, मे. जी.१.एस सिक्युर सोल्युशन प्रा. ली,मे. प्रोटेक्ट शिल्ड फोर्स,मे. राज सिक्युरिटी एन्ड फॅसिलिटी मॅनेजमेंट, मे. हाय अलर्ट सिक्युरिटी सर्व्हिसेस अँड एन्टरप्रायझेस, मे. बिमला सिक्युरिटी फोर्से,मे. यशराज सिक्युरिटी सर्व्हिस & प्लेसमेंट सर्व्हिसस, मे. राजतारा फॅसिलिटीज सर्व्हिसेस,मे. सागर सिक्युरिटी सर्व्हिसेस, मे. स्वामी ओम सिक्युरिटी, मे. एस के सर्व्हिसेस,मे. सनराईस सिक्युरिटी एजन्सी, मे. बालाजी इंटरप्राझेस वारजे, मे. एस एम ग्रुप, मे. ईगल आय गार्डस सर्व्हिसेस, मे. चिराग इंडस्ट्रीज़ सर्व्हिसेस,मे. जयमा एन्टरप्रायझेस,मे. डी. पी. एस, मे. थर्ड आय सिक्युरिटी & बाउन्सर सर्व्हिसेस,मे. परफेक्ट सर्व्हिसेस प्रोप्रटी सोल्युशन,मे. फिनिक्स सिक्युरिटी एन्ड फॅसिलिटीस सर्व्हिसेस, मे. सिक्युराईस,मे. संपदा एन्टरप्राइसेस,मे. ओम साई सेफगार्ड सर्व्हिसेस, मे. ब्लॅक कामाडो सिक्युरिटी, मे. स्वामी ओम सिक्युरिटी, मे. स्टार सिक्युरिटी सर्व्हिसेस, मे. प्रसन्ना असोशिएट, मे. क्विक रिएक्शन फोर्स,मे. सेवेन फोर्से डिटेक्टीव & सिक्युरिटी सर्व्हिसेस, मे. एम बी आर एन्टरप्राइसेस प्रा. लि.,मे. तनिष एन्टरप्राइसेस, मे. सहारा एन्टरप्राइसेस, मे. डी के ग्रुप मॅनपावर सर्व्हिसेस इ. खाजगी सुरक्षा संस्थेच्या मालकांनी सुरक्षित पुणे करण्यासाठी खारीचा वाटा उचलेला आहे दिसून आले.

पी-४ मुख्य समन्वयक यांनी सांगितले कि १४ एप्रिल पर्यंत किंवा अजून हि काही कालखंड आम्ही तन-मन-धन देऊन पुणे पोलिसांच्या समवेत दिवस रात्र कर्तव्य करून पुणे जिल्ह्याला सुरक्षित करण्यासाठी प्रशासनाच्या आदेश प्रमाणे कर्तव्य करणार आहोत.