Home ताज्या बातम्या पी-४ चे काम कौतुकास्पद : अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे

पी-४ चे काम कौतुकास्पद : अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे

0

पुणे शहरात पोलीस प्रायव्हेट सेक्युरिटी पार्टनरशिप प्रोग्राम (पी-४) यांच्या माध्यमातून खाजगी सुरक्षा रक्षक संस्थेचे चेहरामोहरा बदलवून मालकांना व त्यांच्या कर्मचार्यांना कर्तव्यदक्ष व अतिसंवेदशील आणि अत्याधुनिक गोष्टींचा वापर करून सर्वच क्षेत्रातील गुन्हेगारीची तात्काळ माहिती तसेच गुन्हेगारांवर सतर्क नागरिकाची काय भूमिका असली पाहिजे तसेच शहरातील सर्व पोलीस ठाण्यात पी-४ च्या साहयाने माहितीची देवाण घेवाण करणे शक्य आहे व विविध समाजोपयोगी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याच्या माध्यमातून पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात नियोजनबद्ध आणि निर्णयात्मक खाजगी सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या मालकांना सोबत घेऊन त्यांच्याच सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी पोलीस प्रायव्हेट सेक्युरिटी पार्टनरशिप प्रोग्राम (पी-४) या उपक्रमाच्या मदतीने पोलीस अधिकारी व चालक मालक यांचा सवांद वाढविण्यासाठी आज आयुक्तालयात रेझिंग डे च्या निमित्ताने बैठक पार पडली. त्यात काही नामांकित मालकांचा व पी-४ च्या यशोगाथेचा गौरव करण्यात आला.

पुणे मा. पोलीस आयुक्त, डॉ . के. वेंकटेशम (भापोसे), मा. पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे (भापोसे) यांच्या मार्गदर्शनाने मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) मा.अशोक मोराळे (भापोसे) यांनी चालक मालक व पोलिस यांचा संवादातून विविध माहिती बाहेर येऊन आपल्या पुण्याला अधिक सुरक्षित करता येईल याचे मार्गदर्शन केले. या बैठकीला पुणे शहरातील सुरक्षा रक्षक सेवा पुरवठादार संस्थेचे दोनशेपेक्षा अधिक मालक आणि चालक उपस्थित होते .


पी-४ च्या माध्यमातून ३०० सुरक्षा एजेन्सीचे मालक एकत्रीत येऊन पोलीस पाल्यांसाठी व पोलीस प्रशासनासाठी काही उपक्रम राबवताना दिसत आहेत. सुरक्षा सेवेच्या कर्तव्याबरोबरच समाजिक उपक्रम राबविण्याचे काम देखील पी-४ करणार आहेत असे पी-४ चे मुख्य समन्वयक सचिन मोरे यांनी नवीन वर्षी काही संकल्प केले ते मनोगतात सांगितले.
 पोलिस पाल्यांसाठी वार्षिक स्पर्धा परीक्षेची पुस्तके खरेदी – रुपये २,५०,०००/-
 स्पर्धा परीक्षा कार्यशाळा व व्याख्याने, अंतर्गत स्पर्धा (खेळ) विविध प्रकारचे मॅचेसेस आयोजन
 पोलिस स्टेशन व पोलीस प्रशासनाचे कार्यालय हे त्रैमासिक डीप क्लीनिंग उपक्रम राबवणार आहोत.
 पोलिस ठाणे अंतर्गत अक्वा गार्ड मशीन बसवणे, स्वच्छता गृहे यांची दुरुस्ती करणे.
 पोलीस कर्मचारी व अधिकारी यांचा करिता कर्तव्य करताना अपघात झाल्यास (अपघात निधी २,००,०००/- वारसदारांना देऊ करणार.
 सर्व सुरक्षा सप्ताहामध्ये सर्व मोठे बंदोबस्त असल्यास यासाठी पी ४ कडून मोठे मनुष्यबळ पुरवणार.
 पोलीस पाल्यांसाठी नोकरी भरती मेळाव्याचे आयोजन करणार.
 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मुलाचा आणि मुलीचा लग्नात पी ४ कडून १ महिला सुरक्षा रक्षक, पुरुष सुरक्षा रक्षक आणि २ बाउन्सर हे मदतनीस देणार …इ