Home ताज्या बातम्या पी-४ च्या सतर्कतेने एक तोतया गजाआड

पी-४ च्या सतर्कतेने एक तोतया गजाआड

0

दिनांक :- २६/११ जामखेड रोजी

सुलेखा डॉट कॉम च्या माध्यमातून खोटी वेबसाईट तयार करून ६० सुरक्षा गार्डस पाहिजेत अशी जाहिरात करून लाखोंचा गंडा घालणारा हरिचंद्र गोपाळ बेलवले (मोहन) इसमास पोलीस प्रायव्हेट सेक्युरिटी पार्टनरशिप प्रोग्रॅम चे समन्व्यक श्री.ब्रिजेश तिवारी आणि अमर सिंग (राज सेक्युरिटी अँड फॅसिलिटीज मॅनेजमेन्ट प्रा.ली पुणे) चे मालक यांनी सतर्कतेने लोकांना फसवणार हरिचंद्र उर्फ मोहन राहणार शहापूर (ठाणे) यांस पकडून जामखेड जिल्हा अहमदनगर पोलिसांच्या ताब्यात दिले तसेच त्यावर एफ आय आर दाखल केली. सदरचा इसम हा सिक्युरिटीच्या मालकांना जस्ट डायल व विविध वेबसाइट च्या माध्यमातून पत्ते घेऊन मोठ्या मोठ्या कंपनीच्या मनुष्यबळ विकास अधिकारी असून काम मिळवून देतो असे सांगून २०,००० ते ५०,००० रुपये आणि ३% ते ५% प्रतिमहिना हप्ता असे सांगून सर्व सामान्य सुरक्षा एजेन्सीच्या मालकांना गंडा घालायचा.
२५ नोव्हेंबर रोजी पी-४ टीम आणि जामखेड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.प्रभाकर पाटील व पोलीस शिपाई बाबुराव सानप यांच्या मार्गदर्शनाखाली हरिचंद्र उर्फ मोहन या तोतयास अटक केली.

सर्व स्तरातून सेक्युरिटी एजेन्सीच्या मालकांकडून श्री.ब्रिजेश तिवारी आणि अमरसिंग (राज सेक्युरिटी अँड फॅसिलिटीज मॅनेजमेन्ट प्रा.ली पुणे) यांचे कौतूक आणि अभिनंदन करताना दिसले.तसेच श्री.ब्रिजेश तिवारी त्यांनी सांगितले कि ऑनलाईन कामे घेताना सावधानी बाळगा आणि खात्री केल्याशिवाय व्यवसाय करू नका.

जामखेड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.प्रभाकर पाटील हे पुढील तपास करीत आहेत.