पी-४ फाउंडेशन संस्थेचा धक्कादायक निकाल

- Advertisement -

पुणे- प्रतिनिधी

पुण्यामध्ये महाराष्ट्र खाजगी सुरक्षा संस्थांच्या निवडणुकीचा नुकताच लागला.

महाराष्ट्रातील सर्वांत मोठी खाजगी सुरक्षा रक्षक सेवा पुरवठादार संस्था समजली जाणारी पी-४ फाउंडेशन (पोलीस प्रायव्हेट सिक्युरिटी पार्टनरशिप प्रोग्रॅम महाराष्ट्र राज्य ) निवडणूक झाली.

या निवडणुकीत पी-४ मधील २९ मालकांनी संचालक (मुख्य समन्वयक) या पदासाठी अर्ज दाखल केले होते. अनेक सुरक्षा रक्षक असलेल्या मालकांचा समूहाने पुणे शहर व जिल्ह्यात कामकाज व्यवस्थितरित्या मतदान केले. पुण्यात खाजगी सुरक्षा पुरवणाऱ्या एजन्सीला या निवडणुकीमुळे वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे.

निवडणुकीसाठी प्रत्येकाची मोर्चेबांधणी वेगवेगळ्या विषयांवर झाल्यामुळे रविवारी झालेल्या निवडणुकीत धक्कादायक निकाल आला. वरिष्ठ निवडणूक अधिकारी म्हणून विक्रम उरमोडे साहेब तसेच अभिषेक देशमुख साहेब यांनी अंतर्गत प्रशासनाच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया पार पडली.

संस्थेच्या निवडणूक २०२० च्या पार्श्वभूमीवर २९ जागांवर एकून ७ जागांवर ‘काटे की टक्कर’, झाली व मालकांच्या प्रतिष्ठेची ‘लढाई’त जुन्या कोर कमिटी मधील २ जागा गमवाव्या लागल्या.

या निवडणुकीसाठी पुण्यातील नामांकित १७ एजेन्सीचे मालक निवडून आले.

सचिन मोरे ​ ​​भारत शिल्ड फोर्स प्रा. ली​​​​, सुवर्णा चाकोरकर ​​​तनिष एन्टरप्रायझेस​​​​, प्रमोद होले ​​​कॉर्डन सिक्युरिटी अँड अलाईड सर्व्हिसेस प्रा. ली​​, विष्णू जाधव ​​​परफेक्ट सर्व्हिसेस प्रोप्रटी सोल्युशन​​​, संभाजी उकिरडे ​​​चिराग इंडस्ट्रीज़ सर्व्हिसेस​​​​, प्रविण ढोकले ​​​स्कॉर्पिअन टास्क फोर्स प्रा. लि​​​, शरद काळे ​​​एस के सर्व्हिसेस​​​​, संभाजी बुचडे ​​​एस एम ग्रुप ​​​​​, ज्ञानेश्वर चोरघे ​​​फिनिक्स सिक्युरिटी एन्ड फॅसिलिटीस सर्व्हिसेस​​ , कुशल लोणकर ​​​थर्ड आय सिक्युरिटी & बाउन्सर सर्व्हिसेस, मनेश घुले ​​​ईगल आय गार्डस ​​​, अवंती जगताप ​​​स्टार सिक्युरिटी ​​​, राजेंद्र राठोड ​​​रिलायबल एच आर फॅसिलिटी​​​, तानाजी भोसले ​​​भोसले ग्रुप ​​​​,ज्योतीबाला शर्मा ​​जे के एन्टरप्रायझेस​​​​, प्रकाश जाधव ​​​सेवेन फोर्से डिटेक्टीव & सिक्युरिटी सर्व्हिसेस​​, सोमनाथ गायकवाड ​​जी.१.एस सिक्युर सोल्युशन प्रा. ली​​​. या एजेन्सी निवडून आल्या.

संस्थेच्या अध्यक्ष पदासाठी सचिन मोरे ​ ​​भारत शिल्ड फोर्स प्रा. ली​​​, संभाजी उकिरडे ​​​चिराग इंडस्ट्रीज़ सर्व्हिसेस​​​​, प्रमोद होले ​​​कॉर्डन सिक्युरिटी अँड अलाईड सर्व्हिसेस प्रा. ली​​, तानाजी भोसले ​​​भोसले ग्रुप इ मालकामध्ये चुरस निर्माण झाली आहे कदाचित सूत्रांकडून असेही समजले जाते कि बिनविरोध होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -