पुणे : प्रतिनिधी
पुणे ग्रामीण पोलीस बांधवांसाठी कोरोना पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन असताना पुणे ग्रामीण कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस स्टेशन आणि हद्दीतील सर्व नाकाबंदी ठिकाणी रात्रंदिवस कार्यरत असलेल्या पोलीस बांधवाना, सुरक्षा कर्मचारी यांना “पी-४ मधील अधिकृत खाजगी सुरक्षा संस्थेच्या माध्यमातून एक सामाजिक बांधिलकी जपत सुसाधनाचे वाटप करण्यात आले.
पोलीस अधीक्षक मा.संदीप पाटील साहेब,अप्पर पोलीस अधीक्षक मा.लांबाते साहेब, एलसीबी व.पो.निरीक्षक घनवट साहेब, सुरक्षा विभागाचे पो.नि.नलावडे साहेब यांनी पी-४ च्या संस्थेच्या कार्याचे तोंडभरून कौतुक करून सुरक्षा सेवाकार्याची प्रशंसा केली यावेळी त्यांनी तेथील मालकांचा संवाद साधून त्यांचा उत्साह वाढविला.
पी-४ च्या अधिकृत संस्थेच्या जिल्यातील ३० सुरक्षा एजेन्सीच्या मालकांना एकत्रीत करून पोलीस प्रशासनासोबत पुणे ग्रामीण कार्यक्षेत्रात सुरक्षा सेवेच्या कर्तव्याबरोबरच सामाजिक उपक्रम राबविण्याचे काम देखील पी-४ च्या माध्यमातून करीत आहेत असे पी-४ चे मुख्य समन्वयक सचिन मोरे यांनी सांगितले.
अत्यावश्यक सेवेमधील सुरक्षा कर्मचार्यांकडून ती खबरदारी घेण्यासाठी जी जबाबदारी घेतली आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या साह्याने सर्व ठिकाणी साधने पोचवत आहोत. म्हणून प्रत्येकी पोलीस अधीक्षक कार्यालयाला २००० बॉटल पाणी, १०० ली सेनीटायझर, ५०० मास्क, थर्मामीटर स्कॅनर किट देण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन शाखा यांच्या माध्यमातून करोना आजाराचे संक्रमण थांबविण्यासाठी या विषाणूंचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखणेसाठी अत्यावश्यक उपाय योजने मध्ये पुणे जिल्ह्यातील पोलीस प्रायव्हेट सिक्युरिटी पार्टनरशीप प्रोग्रॅम (पी-४) च्या माध्यमातून जवळपास सर्व पोस्ट वरती सुरक्षा कर्मचारी दिवसरात्र पोलीस कर्मचार्याच्या सोबत कर्तव्यावर दिले आहेत. या वाटप प्रसंगी पी-४ संस्थेचे सर्व समन्वयक उपस्थित होते.
या वाटपप्रसंगी ज्ञानेश्वर चोरघे ,संभाजी बुचडे,दिनेश रायकवार,विष्णू जाधव ,सोमनाथ गायकवाड, प्रकाश जाधव, बालाजी माने,मनिष घुले पाटील,प्रमोद होले,संभाजी उकिरडे,ब्रिजेश तिवारी,…इ च्या पुढाकारातून कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी राज राठोड, दिलीप सोनवणे, अंकुश ढमढेरे, कुशल लोणकर, राजेश मुर्गीरकर, किमंतीलाल शर्मा,शरद काळे,शरद शिंदे,ज्ञानेश्वर गायकवाड,अनिल बेंद्रे,मनोज चौगुले,महेश वीर,दिलीप क्षेत्रे,चंद्रसेन साळुंके,श्री.सिंग सर,…इ उपस्थित होते.