‘पी-४’ संस्थेच्या कार्याचे तोंडभरून कौतुक

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असताना पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील ६५ नाकाबंदी ठिकाणी व सर्वच पोलीस स्टेशनला करोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून सार्वजनिक ठिकाणी रात्रंदिवस कार्यरत असलेल्या पोलीस बांधवाना, सुरक्षा कर्मचारी यांना पी-४ संस्थेच्या माध्यमातून एक सामाजिक बांधिलकी जपत पी. पी.ई किट व पाणी वाटप करण्यात आले.

बाहेरगावचे स्पर्धा परीक्षा करीत असलेले आणि पुणे शहरात अडकलेले विद्यार्थी, निराधार ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग,असंघटीत कामगार वर्ग तसेच पुण्यात अडकलेल्या इतर राज्यातील व्यक्तींच्या मदतीसाठी पुणे पोलिसांच्या आवाहनाला साद देत पी-४ संस्था धावून आली. पुणे पोलिसांच्या नेतृत्वात अनेक सामाजिक संस्थांनी अशा व्यक्तींना आधार दिला. यातीलच एक संस्था म्हणजे पी-४ परिवार. अन्नदानाचे महत्‌कार्य करीत ‘ पी-४’ने गरजूंना दिलेला आधार लाख मोलाचा ठरत आहे.

सह पोलीस आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे पुणे शहर, अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे पुणे शहर, सह पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे पिंपरी चिंचवड यांनी शहरातील अशा व्यक्तींच्या मदतीसाठी स्वयंसेवी संस्थांना हाक दिली. दोन्ही शहरातील जवळपास १५० ठिकाणी बंदोबस्तात मध्ये शहरातील अग्रणी सुरक्षासेवाभावी संस्था ‘पी-४ मैत्री परिवारा’चे कार्य प्रशंसनीय ठरले आहे.

पोलीस प्रायव्हेट सिक्युरिटी पार्टनरशिप प्रोग्राम च्या माध्यमातून २५ मार्चपासून लॉकडाऊनच्या काळात बाहेरगावचे होस्टलवर किंवा रुमवर राहणारे विद्यार्थी ज्यांच्याकडे जेवणाची काही सोय नाही अशांना भोजन पुरविण्याची व्यवस्था उभारली. आज सुमारे ५०० विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्णवाहिका चालक आदींना फूड पॅकेट पोहचविण्यात येतात.

अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी दिली भेट

पुणे शहराचे अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे व सह पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे पिंपरी चिंचवड यांनी विविध भेट देऊन ‘पी-४’ संस्थेच्या कार्याचे तोंडभरून कौतुक करून सुरक्षा सेवाकार्याची प्रशंसा केली. यावेळी त्यांनी तेथील स्वयंसेवकांशी संवाद साधून त्यांचा उत्साह वाढविला.

पी-४ च्या अधिकृत संस्थेच्या जिल्यातील १२९ सुरक्षा एजेन्सीच्या मालकांना एकत्रीत करून पोलीस प्रशासनासोबत सुरक्षा सेवेच्या कर्तव्याबरोबरच सामाजिक उपक्रम राबविण्याचे काम देखील पी-४ च्या माध्यमातून करीत आहेत असे पी-४ चे मुख्य समन्वयक सचिन मोरे यांनी सांगितले.

अत्यावश्यक सेवेमधील सुरक्षा कर्मचार्यांकडून प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्यासाठी माहिती व सूचना ज्या केल्या आहेत त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या साह्याने सर्व ठिकाणी पोचवत आहोत. आपत्ती व्यवस्थापन शाखा यांच्या माध्यमातून करोना आजाराचे संक्रमण थांबविण्यासाठी या विषाणूंचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखणेसाठी अत्यावश्यक उपाय योजने मध्ये पुणे जिल्ह्यातील पोलीस प्रायव्हेट सिक्युरिटी पार्टनरशीप प्रोग्रॅम (पी-४) मधील जवळपास १८ हजार कर्मचारी दिवसरात्र पोलीस कर्मचार्याच्या सोबत कर्तव्यावर आहेत.

पी-४ संस्थेचे सर्व समन्वयक मे. भारत शिल्ड फोर्स प्रा. ली, एम बी आर एन्टरप्राइसेस प्रा. लि., मे. कॉर्डन सिक्युरिटी अँड अलाईड सर्व्हिसेस प्रा. ली, मे. ईगल आय गार्डस सर्व्हिसेस, मे. चिराग इंडस्ट्रीज़ सर्व्हिसेस, मे. जी.१.एस सिक्युर सोल्युशन प्रा. ली, मे. राज सिक्युरिटी एन्ड फॅसिलिटी मॅनेजमेंट, मे. एस एम ग्रुप, मे. परफेक्ट सर्व्हिसेस प्रोप्रटी सोल्युशन, मे. फिनिक्स सिक्युरिटी एन्ड फॅसिलिटीस सर्व्हिसेस, मे. सेवेन फोर्से डिटेक्टीव & सिक्युरिटी सर्व्हिसेस, भोसले ग्रुप, मे. रिलायबल एच आर फॅसिलिटी, मे. प्रोटेक्ट शिल्ड फोर्स, मे. थर्ड आय सिक्युरिटी & बाउन्सर सर्व्हिसेस, मे. एस के असोशिएट,मे. एस जे फॅसिलिटी मॅनेजमेंट, मे. एन एस पी एस प्रा ली, मे. संपदा एन्टरप्राइसेस,मे. ओम साई सेफगार्ड सर्व्हिसेस, मे. ब्लॅक कामाडो सिक्युरिटी, मे. स्वामी ओम सिक्युरिटी, मे. स्टार सिक्युरिटी सर्व्हिसेस, मे. प्रसन्ना असोशिएट, मे. के सम्राट ग्रुप, मे. अशोक फॅसिलिटी सर्व्हिसेस, मे. एस एम डब्लु मार्शल सिक्युरिटी प्रा. ली, मे. हाय अलर्ट सिक्युरिटी सर्व्हिसेस अँड एन्टरप्रायझेस, मे. बिमला सिक्युरिटी फोर्से,मे. यशराज सिक्युरिटी सर्व्हिस & प्लेसमेंट सर्व्हिसस, मे. राजतारा फॅसिलिटीज सर्व्हिसेस,मे. सागर सिक्युरिटी सर्व्हिसेस, मे. स्वामी ओम सिक्युरिटी, मे. डी. पी. एस, मे. एस के सर्व्हिसेस, मे. सनराईस सिक्युरिटी एजन्सी, मे. तनिष एन्टरप्राइसेस, मे. सहारा एन्टरप्राइसेस, मे. डी के ग्रुप मॅनपावर सर्व्हिसेस इ. खाजगी सुरक्षा संस्थेच्या मालकांनी सुरक्षित पुणे करण्यासाठी या महासंकटसमयी करीत असलेल्या कार्याला तोड नाही. भविष्यात जर गरज पडली तर पी-४ पुन्हा काही संसाधने उपलब्ध करून देईल, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.

पी-४ वतीने पी. पी.ई किट व पाणी वाटप तसेच अन्नदानासोबतच शहरातील निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सेवा पुरवित आहे. सुरक्षा साधनांची मागणी असलेल्या पोलीस बांधवांसाठी व गरजूंना हडपसर ९६२३६१२४६३,९५१८७८८६१२,९०११२११८२०, कोंढवा ८८८८८०१०८८, ९०४९८८३९३९, चंदननगर–खराडी ९८५००५७२५९, ९८५०००५४५४, ९८५००५३००३, मार्केट यार्ड ७९७२००३१९९, ७७९८४१८१८१, विश्रांतवाडी ८०८७०८३१०२, ९७६३४६०२४६, ९८२२२०९६८२, पुणे सर्व पेठा-कोथरूड ९८२२२७७७१२, ८३०८३०१६२७,९९२१०४७५०१, भारती विद्यापीठ ८४१२०८४६८७, दिघी ९९२३४०९३३०, ७७२००७२७५५,९६९६०६६१६१, कात्रज ७७७५०९८७७७, ८७९३२७९९००, ९८८१०५२७४५, वाघोली हिंजेवाडी ९५२७९४९९९९,९८८१११११७७, वाकड ९०११५११०४४, ९५४५८४३९७१, चिंचवड-भोसरी-रावेत ८७९३७१७४९५, आळंदी ९०४९३८४३८४, ९८५०४९८३९९, ९९२२९८४८७७ मो. क्रमांक संस्थेने जाहीर केले आहे.

- Advertisement -