Home शहरे अहमदनगर पुढारी अहमदनगर ब्रेकींग

पुढारी अहमदनगर ब्रेकींग

0

अहमदनगरः पत्रकार उमेश दारुणकर (वय ४०) यांची रेल्वे गाडी खाली उडी घेऊन आत्महत्या

दैनिक भास्करचे जिल्हा प्रतिनिधी उमेश दारुणकर यांने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. आज दुपारी घडलेल्या या घटेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

दारुणकर हे सुमारे 15 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत होते. सुरुवातीला इलेक्ट्रॉनिक मिडियामध्ये विविध वृत्त वाहिन्यांना काम केल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून ते दैनिक भास्करचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करत होते. आज दुपारी साडेतीन चार वाजण्याच्या दरम्यान त्यांनी नगर-कल्याण रोडवरील रेल्वे ओव्हर ब्रिज खाली गोवा एक्सप्रेसखाली उडी मारून आत्महत्या केली. तोंडावरून रेल्वेचा चाक गेल्याने त्यांचा चेहरा ओळखू येत नव्हता. ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली.