Home गुन्हा पुणे ग्रामीण पोलिसांनी गावठी पिस्टल बाळगणाऱ्याला केले जेरबंद

पुणे ग्रामीण पोलिसांनी गावठी पिस्टल बाळगणाऱ्याला केले जेरबंद

0

पुणे :पुणे ग्रामीण पोलिसांनची कौतुक करण्या सारखी कारवाई होत असून आत्तापर्यंतअवैध धंदे उध्वस्त करून गुन्हेगारी संपवण्याच्या मार्गावर दिसत आहे व पुणे ग्रामीण LCB पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली गावठी पिस्टल घेऊन धरण चौक सिंहगड रोड येथे येनार आहे व LCB टिमने पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून तेथे एक

आरोपीला धरण चौक परिसरात एका व्यक्ती अल्टो एम.एच १२ ई.एक्स ६१७४ या कारमधून आला होता व त्याच्याकडे गावठी पिस्तुल असल्याची मिळाल्याने त्याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांना गावठी पिस्तुल संदर्भात माहिती मिळाली होती.त्यानुसार हवेली पोलिस ठाण्याच्या हद्दीत खडकवासला, धरण चौक, सिंहगड रस्त्यावर दत्तात्रय शिवाजी मते (वय ४५ वर्षे रा.खडकवासला) कारमधून आला. त्याला कारसह ताब्यात घेवून त्यांच्याकडील बेकायदा, विनापरवाना व बेकायदेशीर कोणत्या तरी हेतुने जवळ गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस असा एकूण २ लाख ४०० रूपयचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.मते यांच्याविरोधात यापूर्वी हाणामारीचे गुन्हे दाखल आहेत. त्याला पुढील कारवाईसाठी हवेली पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले. सदर ची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. दत्तात्रय गुंड, सहा.फौ. दयानंद लिमण, पो. हवालदार महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, पोलिस नाईक ज्ञानेश्वर क्षिरसागर, पोलिस शिपाई अक्षय जावळे यांनी केलेली आहे