Home शहरे पुणे पुणे, पिंपरीत ७,१४१ रुग्ण करोनामुक्त

पुणे, पिंपरीत ७,१४१ रुग्ण करोनामुक्त

0
पुणे, पिंपरीत ७,१४१ रुग्ण करोनामुक्त

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यात दिवसभरात ११ हजार ६६१ करोनारुग्ण नव्याने आढळले आहेत. शहरातील रुग्णसंख्या स्थिरावत असली, तरी आता ग्रामीण भागातील रुग्णसंख्या वाढताना दिसत असल्याने डोकेदुखी कायम आहे.

पुणे शहरात रविवारीसुद्धा नव्याने पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या चार हजारांपर्यंत स्थिरावली आहे. चार हजार ६५६ एवढे रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

जिल्ह्यात एका दिवसात १५९ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात गेल्या २४ तासांत ६६ जणांचा मृत्यू झाला असून, पिंपरी-चिंचवडमध्ये ५५, तर ग्रामीण भागात ३८ जणांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात आतापर्यंत १३ हजार ३९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरातील रुग्णालयांत १,४०१ रुग्णांची प्रकृती गंभीर असून, सहा हजार ७७४ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. शहरात रविवारी १६ हजारहून अधिक चाचण्या झाल्या. गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या साडेतीन ते चार हजारांच्या जवळपासच स्थिरावल्याचे चित्र आहे. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्याही आता कमी होत असून, ती ४२ हजार २२९ पर्यंत खाली आली आहे.

पुण्यातील नवीन रुग्ण – ४,०४४

बरे झालेले रुग्ण – ४,६५६

गंभीर रुग्णांची संख्या : १,४०१

दिवसभरात मृत्यू : ६६ (२७ शहराबाहेरील)

पिंपरी-चिंचवडची स्थिती

नवीन रुग्ण – २,९३३

बरे झालेले रुग्ण – २,४८५

गंभीर रुग्णांची संख्या – ४८३

दिवसभरात मृत्यू – ९२ (३७ शहराबाहेरील)

Source link