Home गुन्हा पुणे पोलिसांची धडक कारवाई चतुर्शिंगी पोलिसांनी मसाज पार्लर वरती छापा टाकून तीन मुलींना वेश्या व्यवसायातून सुटका केली

पुणे पोलिसांची धडक कारवाई चतुर्शिंगी पोलिसांनी मसाज पार्लर वरती छापा टाकून तीन मुलींना वेश्या व्यवसायातून सुटका केली

पुणे : संतोष सावंत

मंगळवार रोजी २३/०७/२०१९ रोजी सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखेकडील पोलिस निरीक्षक, वैशाली चांदगुडे यांच्याकडून माहिती मिळाली की “जेसी प्रायव्हेट लिमिटेड”, स्पा आणि सलून मसाज सेंटर , औंध रोड येथील स्पा मसाज सेंटर तेथे छापा टाकला. सदरचे छाप्यात दरम्यान दोन मेघालयीन २१ वर्षीय मुली व १ महाराष्ट्रीयन मुलगी अशा एकूण ३ सज्ञान महिलांची वेश्‍या व्यवसायातून सुटका करून वेश्या व्यवसायास लावणारा पुरुष चो संग गेउन , र. साऊथ कोरिया यांचे विरुद्ध चतुर्शिंगी पोलीस स्टेशन येथे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा अन्वे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आरोपी यास कारवाईच्या वेळी ताब्यात घेण्यात आले आहे. कारवाई वेळी रोख रक्कम ७५००/- रुपये., मोबाईल फोन व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे तसेच या गुन्ह्यातील पीडित मुलींना रेस्क्यू होम मोहम्मद्वाडी, हडपसर येथे संरक्षणकामी ठेवण्यात आले आहे. यातील नमूद कारवाई ही माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे बच्चन सिंह सीनियर पोलीस अधिक्षक गुन्हे शाखा-२ भानुप्रताप बर्गे, यांचे मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वैशाली चांदगुडे सपोफौ एन.व्ही.झांजरे, सपोफौ , पी. मोकाशी, पोहवा. पी. व्ही. मगर , मपोहवा. जाधव, म पोना. बारसकर , पोना. आर.एस. वंजारी , पोना. जाधव व चतुर्शिंगी पोलीस स्टेशन कडील पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे व त्यांचे स्टाफ सह संयुक्तिक कारवाई केली.