पुणे पोलीस आयुक्तांची धडक कारवाई रेकॉर्डवरील फरार असे ११० गुन्हेगार पोलिसांनी चेक केले आहेत.

- Advertisement -

पुणे. परवेज शेख
पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम, सहआयुक्त रविंद्र शिसवे, गुन्हे अप्पर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, गुन्हे पोलिस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली घरफोडे, तडीपार, रेकॉर्डवरील फरार असे ११० गुन्हेगार पोलिसांनी चेक केले आहेत.
सदर गुन्ह्यात २५ गुन्हेगार तुरूंगात, ८ गुन्हेगार तडीपार व १ मयत आढळला. यात एकूण ३० गुन्हेगार मिळून आले असून ४६ गुन्हेगार मिळून आले नाहीत. मिळूनआलेल्या गुन्हागारांकडून इंट्रॉगेशन अर्ज भरून घेतले आहेत. या दरम्यान बंडगार्डन, डेक्कन, हडपसर, कोंढवा, वानवडी, मुंढवा येथे पानटपरी व हॉटेल शर्तीपेक्षा जास्त वेळ चालू ठेवले म्हणून एकूण १९ खटले दाखल केले आहेत. तसेच वानवडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत शॉपीवर असलेल्या हॉटेलवर छापा टाकून विनापरवाना देशी व विदेशी दारू विकताना मिळून आले असून त्यात एकाला अटक केली आहे. यात ५३ बाटल्या व १,०२०/- असा एकूण २,२९०/- रूपयाचा माल जप्त केला आहे. या दरम्यान भारती पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक इसम एका मुलीकडून वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करत असल्याचे आढळले असून या तीघांना अटक केले असून पिडीत मुलीची सुटका केली आहे.
सदर कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वायकर, गजानन पवार, राजेंद्र मोकाशी, अंजुमन बागवान, दत्ता चव्हाण, राजेंद्र मोहिते, श्री. टिकोळे व श्रीमती वैशाली चांदगुडे व त्यांच्या पथकातील कर्मचार्‍यांनी कारवाई केली आहे.

- Advertisement -