Home अश्रेणीबद्ध पुणे ; बनावट नोटा बनवणाऱ्या गुन्हेगारला ठोकल्या बेड्या

पुणे ; बनावट नोटा बनवणाऱ्या गुन्हेगारला ठोकल्या बेड्या

पुणे:परवेज शेख
शुभम क्षिरसागर (वय २४, रा सातारा), राहुल बचकर (वय १९, रा. मु.पो. वीर, ता पुरंदर), निर्धार कळमकर (रा. उंड्री) हे पद्मजी पार्क, भवानी पेठ येथे ५००, १००, २ हजार रूपयाच्या बनावट नोटा वितरीत करताना मिळून आले. यावेळी ५,१८,४००/- रूपयांची होंडा सीआरव्ही गाडी व दोनशे रूपयांच्या ९२ नोटा, तसेच ४६,१०० रूपयात भारतीय चलनातील ५००, १००, २००० रूपयांच्याही बनावट नोटा गाडीत मिळाल्या असून सदर घटना २८ जुलै रोजी दुुपारी २.३० वाजता घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर आरोपी एकूण ६४, ५००/- रूपयांच्या बनावट नोटा वितरीत करण्याच्या प्रयत्नात होते. समर्थ पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दखल करण्यात आला आहे.
यात दाखल अधिकारी खंडणी व अंमली पदार्थविरोधी पथकाचे निखिल मुक्ताजी पवार असून पुढील तपास आनंद रावडे, पोलीस उप निरीक्षक, खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथक, पश्चिम, गुन्हे शाखा पुणे शहर  करीत आहे.