Home ताज्या बातम्या पुणे महानगरपालिका येथे विविध पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तिघांची 18 लाखांची फसवणूक

पुणे महानगरपालिका येथे विविध पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तिघांची 18 लाखांची फसवणूक

0

*पुणे महानगरपालिका येथे विविध पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तिघांची 18 लाखांची फसवणूक*

पुणे जिल्हा परिषद आणि पुणे महानगरपालिका येथे विविध पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तिघांची 18 लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 22 मे ते 31 ऑगस्ट या कालावधीत घडला.

हेमंत शहाजीराव देशमुख (वय 40, रा. जुनी सांगवी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी नितीन रंगनाथ श्रीरामे (वय 29, रा. पिंपळे निलख) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हेमंत याने फिर्यादी नितीन आणि त्यांच्या दोन मित्रांना पुणे जिल्हा परिषद आणि पुणे महानगरपालिका येथे सहाय्यक अभियंता, शिपाई व लिपिक या पदांवर नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. या अमिषापोटी आरोपी हेमंत याने तिघांकडून फुगेवाडी येथील मेगामार्ट येथे रोख रक्कम तसेच ऑनलाइन माध्यमातून वेळोवेळी एकूण 18 लाख रुपये घेतले.

तसेच त्यांना बनावट सही व शिक्क्याचे नियुक्तीपत्र दिले. यातून फिर्यादी नितीन आणि त्यांच्या मित्रांना नोकरी मिळाली नाही. याबाबत त्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.