Home ताज्या बातम्या पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सोहळ्याची मिरवणूक

पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सोहळ्याची मिरवणूक

0

परवेज शेख पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सोहळ्याची मिरवणूक भवानी माता मंदिरा पासून सुरू होऊन एसएसपीएमएस येथे समाप्त झाली. या मिरवणुकीत पुणे शहराचे महापौर मा.श्री. मुरलीधर(आण्णा) मोहळ, उपमहपौर मा.सौ. सरस्वतीताई शेंडगे, सभागृह नेते मा.श्री. धीरजजी घाटे, स्थायी समिती अध्यक्ष मा.श्री. हेमंतजी रासने, नगरसेविका मा.सौ. आरतीताई कोंढरे, नगरसेवक श्री. सम्राटभाऊ थोरात, मा.श्री. अजयजी खेडेकर, नगरसेविका मनिषाताई लडकत व आदी पुणे मनपाचे सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. तसेच पुणे शहरातील विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळी सहभागी झाली होती. त्याच बरोबर पुणे मनपाच्या शाळांमधील विद्यार्थी, महापालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.