Home गुन्हा पुणे विद्यापीठातील २ विद्यार्थीनींची मुंबईतील वेश्या वस्तीतून सुटका

पुणे विद्यापीठातील २ विद्यार्थीनींची मुंबईतील वेश्या वस्तीतून सुटका

0

मुंबई : पुणे विद्यापीठातील २ विद्यार्थ्यांनींची वेश्या व्यावसाय करणाऱ्या दलालापासून सुटका करण्यात आली आहे. दोन्हीही तरुणी परदेशी नागरीक असून त्या तुर्कमेनिस्तानच्या रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या दोघीही स्टुडंट व्हिसावर पुणे विद्यापीठात शिक्षण घेत होत्या.

मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदेश रेवले यांनी सेक्स रॅकेटवर कारवाई करत दोघींची मुक्तता केली. त्यांनी एकूण ३ मुलींची सुटका केली आहे. त्यापैकी एक तरुणी ही भारतीय आहे.

वर्सोवामधील एक फ्लॅटमध्ये या मुलींना ठेवण्यात आलं होतं. पोलिसांनी बोगस गिऱ्हाईक पाठवून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय. प्रत्येक मुलीच्या बदल्यात ४० हजार रुपये घेत असल्याचंही समोर आलं आहे. मुंबईतील अंधेरी पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वेश्या व्यवसायात दलाली करणारा 26 वर्षीय नावेद अख्तर आणि 22 वर्षीय नाविद सय्यद या दोघांना अटक केली आहे. तर वेश्या व्यवसाय करणारी महिला फरार झाली आहे.