Home ताज्या बातम्या पुणे विभागात प्रशासनाकडून स्थलांतरित मजुरांकरीता निवारा व भोजनाची सोय – विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर

पुणे विभागात प्रशासनाकडून स्थलांतरित मजुरांकरीता निवारा व भोजनाची सोय – विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर

पुणे : – सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 41 कॅम्प, कामगार विभागामार्फत 14 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 5 कॅम्प असे पुणे विभागात एकुण 60 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 2 हजार 379 स्थलांतरित मजूर असून 19 हजार 425 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.