Home शहरे पुणे पुणे शहरातून सांगलीच्या स्वच्छतेसाठी पुणे महापालिकेचे पथक रवाना

पुणे शहरातून सांगलीच्या स्वच्छतेसाठी पुणे महापालिकेचे पथक रवाना

0

पुणे : पुणे शहरातून सांगली शहरातील पूरग्रस्त भागाच्या स्वच्छ्तेसाठी पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या 108 कर्मचाऱ्यांचे पथक आज रविवारी सकाळी रवाना होणार आहे. 103 कर्मचारी आणि पाच मुकादमांचा समावेश असणार असल्याची माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्‍वर मोळक यांनी दिली.
सांगली आणि कोल्हापूर शहरातील पूरस्थिती ओसरण्यास सुरूवात झाल्यानंतर या शहरांच्या स्वच्छताही मोठया प्रमाणात करावी लागणार आहे. त्यामुळे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी महापालिकेने स्वच्छता कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे महापालिकेस सुचविले होते. मात्र, शहरातही पूरस्थिती तसेच पाऊस सुरूच असल्याने या बाबत पालिकेकडून निर्णय घेण्यात आला नव्हता. मात्र, सामाजिक बांधिलकी तसेच या दोन्ही शहरांवर आलेली आपत्ती लक्षात घेता, सामाजिक दातित्त्व म्हणून महापालिकेने पुढे येत अखेर 108 स्वच्छता कर्मचारी सांगली शहराच्या स्वच्छतेसाठी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.